कॉग्रेस पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातून पाच उमेदवारांची नावे जाहीर केली गेली आहेत.सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे मतदार संघातून विश्वजीत कदम यांची उमेदवारी कॉग्रेसने नक्की केली आहे.त्यामुळं सुरेश कलमाडी नावाचा खिलाडी रिंगणातून बाद झालाय.चंद्रपूरमधून संजय देवतळे पालघरमधून राजेंद्र गावित आणि लातूरमधून बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आलीय.नांदेडचा गुंता अजूनही सुटला नाही.अशोक चव्हाण यांना किंवा त्याच्या घरातील कोणाला उमेदवारी दिली तर त्याचे इतरत्रही परिणाम होतील.नाही दिली तर कॉग्रेस निवडणून येऊ शकत नाही अशा स्थितीत करायचं काय या पेचात कॉग्रेस आहे.