मुंबईत महिला पत्रकाराची छेडछाड

0
815

मुंबईत एका महिला पत्रकारावर झालेला बलात्कार,एका हॉटेलाच चार महिला पत्रकारांना दिली गेलेली असभ्य वागणूक आणि कर्नाटकात एका महिला पत्रकाराच्या शर्टचे बटन काढून तिला एका मंत्र्यांने विवस्त्र कऱण्याचा केलेला प्रयत्न या साऱ्या घटना ताज्या असतानाच काल होळीच्या दिवशी मुंबईत एका महिला पत्रकाराशी काही समाजकंटकांनी असभ्य वर्तन करून तिची छेडछाड केली.जिया न्यूज या वाहिनीची ही महिला पत्रकार आहे.अंधेरी भागात ही घटना घडली.

होळीचे कव्हरेज करण्यासाठी आपल्या कॅमेरामनसह बाहेर पडलेली ही महिला पत्रकार एका टोळक्याची शिकार ठरली.टोळक्याने कॅमेऱामनला बेदम मारहाण केली.आणि महिला पत्रकाराशी लोचटपणा करण्याचा प्रयत्न केला गेला.पत्रकार महिलेचा मोबाईलही या टोळक्याने हिसकावून घेतला आहे.या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आङे.पोलिस चौकशी करीत आहेत.
सुरूवातीला आलेल्या बातमीत संबंधित महिलेचे कपडेही टोळक्याने फाडले असे म्हटले होते.परंतू संबंधित महिलेने त्याचा इन्कार केला आहे.माझा मोबाईल काढून घेतला तसेच माझा पाठलाग करून मला पकडण्याचा प्रयत्न केल्याचे या महिला पत्रकाराचे म्हणणे आहे.
या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी चार जणांना अठक केली असती तरी आणखी 30-40 जण बेपत्ता आहेत.पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध करीत आरोपींना तातडीन े पकडण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here