२०१३ मधील पत्रकारांवरील हल्ले

0
1243

11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,
एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,
65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,
अनेकांवर खंडणी,ऍट्रॉसिटी,दरोड्‌याचे खोटे गुन्हे दाखल
[divide style=”3″]

म हाराष्ट्रत पत्रकारांवर अखंडपणे हल्ले सुरू आहेत.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्या मागणीक़डं सरकार करीत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि विद्यमान कायद्याचा गुंडांना धाक उरला नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंतावाटावी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.2013 च्या जानेवारी ते नोव्हेबर या अकरा महिन्यात राज्यात दोन पत्रकांराचे खून झाले ( नरेंद्र दाभोळकर आणि  जळगाव येथील नरेश सोनार ) एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार केला गेला आणि 65 पत्रकारांवर हल्ले झाले, ( यातील काही हल्ल्यात चाकू सारख्या तिक्ष्ण हत्यारांचा वापर केला गेला) पुर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरी यांच्या साऱ्या कुटुंबावरच ऍॅसिड टाकून त्याला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला गेला.हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्यावरच दरोडा,ऍटॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला.त्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाब आणला गेला.इतर प्रकरणातही  केवळ बातमी दिल्यामुळेच हल्ले झाले आहेत.या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने बीड,परभणीत भव्य मोर्चे काढले गेले.8 मे रोजी पनवेल ते मुंबई अशी मोटार रॅली काढली गेली,16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन काळा दिवस म्हणून पाळला.जेथे जेथे पत्रकारांवर हल्ले झाले अशा काही ठिकाणी समितीच्या सदस्यांनी जाऊन संबंधित पत्रकारांची भेट घेतली तसेच त्याना मद तही केली.    ———————-   म ाहिती संकलन—एस.एम.देशमुख
——————————————————————————————————————————————————-

2 जानेवारी 13- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला

3 जानेवारी 13 – बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका पत्रकाराला बातमी दिल्याब्ददल तहसिलदाराची ताकिद

8 जानेवारी 13- उस्मानाबाद येथील पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांच्यावर पोलिसाचा हल्ला

9 जानेवारी 13- आौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे पत्रकार जमील पठाण यांना जिवे मारण्याची धमकी

11 जानेवारी13 – कन्नड तालुक्यीतील शिवणा-टाकळी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोधांना डांबले

13 जानेवारी 13-उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोणचे पत्रार जगदीशचंद्र जोशी यांना गुंडांकडून मारहाण

13 जानेवारी13-नाशिक येथील एका हिंदी दैनिकाच्या पत्रकारास शिवसैनिकांकडून मारहाण

16जानेवारी 13 – पत्रकार हेमंत देसाई यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेख प्रकरणी आर.एस.एसच्या धमक्या

16 जानेवारी 13- पेण तालुक्यातील वडखळ येथील पत्रकार विजय मोकल यांना रवी पाटील यांच्याकडून धमक्या

8 फेब्रुवारी 13-  बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील पत्रकार बळीराम बाजीराव राऊत याच्यावर हल्ला.

10 फेब्रुवारी 13- नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.

4 मार्च 13      – सातारा येथील पत्रकार विशाल कदम यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
5 मार्च 13-     – सातारा येथे भोजपूरी चित्रपट कलावंतांची सहा पत्रकारांना मारहाण.कोंडून ठेवले

12 मार्च 13 – पूर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरीवर अ्रसिड हल्ला,हल्लेखोर कॉग्रेसचा पुढारी

13 मार्च 13- गंगाखेड येथील पत्रकार गंगाधर कांबळे यांच्यावर हल्ला

14 मार्च 13 – उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्यावर हल्ला

19 मार्च 13- नवी मुंबईत आसाराम बापूंच्या समर्थकांची पत्रकारांवर तुफान दगडफेक.सहा पत्रकार जखमी

21 मार्च 13- निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल

27 मार्च 13- टीव्ही-9चे छायाचित्रकार चरण मरगम यांना मुंबईत मारहाण

28 मार्च 13- सातारा येथील पत्रकार रोहित बुधकर यांच्यावर हल्ला

29मार्च 13- राणी सावरगाव येथील राहूल बनाटे आणि संजय राबोले यांच्याविरोधात खोटी तक्रार

30मार्च 13-एबीव्हीपीच्या आंदोलनादरम्यान नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पत्रकारांना धक्काबुक्की

31मार्च 13- ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे यांना संरपंचाची मारहाण

1 एप्रिल 13 – सातारा येथील पत्रकार पियूष भूतकर आणि महेश पवार यांना पोलिसांची दमदाटी

2एप्रिल  13 -वर्धा येथील पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी याना पोलिसांकडून धमक्या

2 एप्रिल 13- मुंबई येथील प्रहारचे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना सुरक्षा रक्षकांची मारहाण

4 एप्रिल 13- पारनेर येथील सकाळचे बातमीदार अनिल चौधरी यांच्यावर उपसंरपंचाकडून हल्ला.

6एप्रिल  13- न्यूज नेशनच्या सोनू कनोजिया आणि इम्रान या दोघांना निलंबित उपायुक्तांची मारहाण

13 एपिॅल13- बीड येथील पत्रकार सतीश शिंदे यांना शिरूर तालुक्यातील गोतळवाडा येथे मारहाण

16एप्रिल 13- नेवासा फाटा येथील पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांना एपीआयकडून मारहाण

25 एप्रिल 13- विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल

1 मे      13-सोनपेठ येथील पत्रकार सुधीर बिदू यांच्यावर हल्ला

3 ंमे       13 – झी न्यूजचे लातूर येथील प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना राज ठाकरे यांच्या अंगरक्षकाची धक्काबुक्की.ठाकरेकडूनही दम

7 मे        13 गंगाखेड येथील पत्रकार संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला.दोन्ही पाय फॅॅक्चर

9 मे        13 सोनपेठ येथील पत्रकार सय्यद कादिर,भागवत पोपडे,कृष्णा पिंगळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल.
22जून      13 इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांच्या घरावर आवाडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. ब ातमीचा राग

26 जून     13 माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील झुंजार नेताचे वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर हल्ला.

28 जून     13 आयबीएन- लोकमतचे औरंगाबाद ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम आणि फोटोग्राफर सुधीर जाधव यांना धक्काबुक्की.

3 जुलै  13 – नक्षर जिल्हयातील कर्जत येथील काही पत्रकारांना तेथील पी आय़ची बघून घेतो अशी धमकी.

27 जुलै  13- संगमनेर येथील युवा पत्रकार अंकुश बुब यांच्यावर जीवघेणा हल्ला.

28 जुलै 13 – पुर्णा येथील सांजवार्ताचे वार्ताहर अनिल अहिरे यांच्यावर अगोदरच्या ऍशिड हल्ला प्रकरणातील गुंड अ़निल कुरकुरे याच्याकडून हल्ला.

20 ऑगस्ट 13- साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या छाडून हत्या.तीन महिन्यानंतरही मारेकरी सापडलेच नाहीत.

31 ऑगस्ट 13- नगरचे आमदार अनिल राठोड यांच्या मुलाचा देशदूत कार्यालयासमोर धुडगूस.वीज बिल थकबाकीची बातमी दिल्याने राग.

31 ऑगस्ट 13- मंगळवेढा तालुक्यातील दहिवड येथील पत्रकार प्रमोद बनसोडे यांना वाळू माफियाची त्यांच्या घरात घुसून मारहाण.शिविगाळ.

4 सप्टेंबर   13- आसाराम समर्थकांची पुण्यात टीव्ही-9 चे सचिन जाधव आणि छायाचित्रकार अभिजित पिसे यांना मारहाण

4 सप्टेंबर   13 परभणी येथील शेतकरी आंदोलनाचे चित्रिकरण करताना पीएसआय प्रकाश बांद्रे यांची दिलीप बनकर यांना मारहाण

6 सप्टेंबर    13- जयमहाराष्ट्र चे विलास बढे यांना एका पार्टीचे चित्रिकऱण करताना मारहाण.सुरक्षा रक्षकाचे कृत्य.

16 सप्टेंबर 13- गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांना रेती तष्कराची मारहाण.ओमप्रकाश हिदू जागृतीचे वार्ताहर

21 सप्टेंबर  13- नेवासा येथील नवाकाळ,देशदूतचे वार्ताहर राजेंद्र वाघमारे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी.गुन्हा दाखल.

1ऑक्टोबर 13- जय महाराष्ट्र चॅनलचे विलास बढे यांच्यावर जातपंचायतीच्या लोकांचा हल्ला.बढे यांना दोन तास घरात डांबले.

1 ऑक्टोबर 13- नक्षर जिल्हयातील श्रीगोंदा येथे पत्रकार धनंजय कानगुडे यांच्यावर हल्ला.धर्माची चिकित्सा करणाऱ्या बातम्या छापल्या म्हणून हल्ला.

2 ऑकटोबर 13- मुख्यमंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टीव्ही-9 चे रामराजे शिंदे आणि सागर कुळकर्णी यांना मारहाण,धक्काबुक्की.

5 ऑकटोबर 13- आळंदी येथील पत्रकार विलास काटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या. काटे सकाळचे वार्ताहर.

7 ऑकटोबर 13 -चंद्रपूर येथे पत्रकाराच्या विरोधात चौकाचौकात पोस्टरबाजी, पत्रकाराचा कुत्रे असा उल्लेख.

8 ऑक्टोबर 13- आदित्य पंचोलीची झी न्यूजच्या महिला पत्रकाराबरोबर असभ्य वर्तवणूक,कॅमेरॅची मोडतोड.

22 ऑक्टोबर 13- अहमदनगर येथील महान्यूजच्या कॅमेरामनला  कव्हरेज करतानाच मारहाण

30 ऑक्टोबर 13- यवतमाळ जिल्हयातील वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.मोट्या प्रमाणात मोडतोड.

9 नोव्हेंबर      13- हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर चाकूहल्ला.वरती त्यांच्यावरच खंडणी,ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल.

14 नोव्हेंबर    13- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील नरेश सोनार यांची गाडीतून बाहेर फेकून हत्त्या.परप्रांतिय टोळीचे कृत्य.

25 नोव्हेबर    13- कंधार येथील लोकपत्रचे पत्रकार उत्तम चव्हाण यांना मनसे तालुका प्रमुखाकडून धमक्या.पोलिसात तक्रार दाखल.

30 नोव्हेबर   13 माजलगाव  येथील सुराज्यचे पत्रकार संतोष जेथलिया यांना धमक्या.नगराध्यक्षांच्य विरोधात बातमी छापल्याने रागातून प्रकार.तक्रार दाखल.
[divide]
सदरची माहिती पुनर्मुद्रीत करताना निमंत्रक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या  असा उल्लेख करणे आवश्यक आहे. –

[divide]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here