पत्रकार संतोष भारतीय यांच्यावर अण्णा हजारे यांनी धोकेबाज असल्याचा आरोप केला आहे.कोण आहेत हे भारतीय.स्वतःला देशातील काही मान्यवर पत्रकारांमध्ये स्वतःचा समावेश कऱणारे भारतीय पडद्याआडच्या राजकारणातील माहिर खिलाडी आहेत.साप्ताहिक चौथी दुनियाचे संपादक असलेल्या भारतीय यांच्यावर याअगोदर टीप अण्णामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता.जनरल व्ही.के.सिंग यांच्या माध्यमातून ते अण्णांपर्यत पोहोचले होते.यापुर्वी त्यांची व्हीपीसिंग,चंद्रशेखर आणि रामविलास पासवान यांच्याशी जवळीक ठेऊन होते.1989मध्ये त्यांनी फरूखाबाद लोकसभा निवडणूल लढविली आणि ती जिंकलीही होती.
अण्णांनी त्यांना धोकेबाज ठरविल्यानंतर भारतीय यांनीही अण्णांना उत्तर दिले आहे.ते म्हणतात,अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना बाजुला केल्यानंतर सहा महिने त्यांच्याजवळ यायला कोणी तयार नव्हते.अशा स्थितीत मी त्यांच्या साडे आठशेच्यावर सभा घेतल्या.त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी जे येतात त्यांना अण्णांनी धोका दिला आहे.भारतीय म्ङणतात,चांगल्या गाडीतून प्रवास,चांगल्या ठिकाणी उतरण्याची व्यवस्था मी करीत होतो तेव्हा अण्णांनी हे पैसे येतात कोठून असे विचारले नाही पण एका रॅलीसाठी गर्दी जमली नाही म्हणून मी धोकेबाज कसा झालो असा प्रश्न भारतीय यांनी उभा केला आहे.