9 ऑक्टोबरला सांगलीत पत्रकारांचा महामेळावा

0
909

9 ऑक्टोबरला सांगलीत पत्रकारांचा महामेळावा
2 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी कऱण्याचा निर्धार

एस. एम्. देशमुख प्रमुख मार्गदर्शक : सांगली जिल्हा पत्रकार संघाची बैठक

सांगली जिल्ह्यातील पत्रकाराना मार्गदर्शन व्हावे व त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी (दि.9 ऑक्टोबर 2016) सांगलीत भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम्. देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्णय आज सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत घेण्यात आला. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व पत्रकार संरक्षक कायदा व्हावा यासाठी 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यव्यापी मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सांगली जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष जालिंदर हुलवान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार संपत बर्गे (दै. महासत्ता), जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर (दै. तरुण भारत), बलराज पवार (दै. सकाळ),घनश्याम नवाथे (दै. सकाळ), गणेश कांबळे (दै. पुढारी),अविनाश कोळी (दै. लोकमत), किशोर जाधव (पोलीस टाईम्स) संजय देसाई (महाराष्ट्र १), शंकर देवकुळे (बालाजी न्युज), सुकुमार पाटील (दै. प्रतिध्वनी), गजानन साळुंखे (दै. लोकमत), मोहन वाटवे (दै.केसरी), प्रशांत साळुंखे (बंधुता),विकास सूर्यवंशी (दै.केसरी), शर्वरी पवार ( जागर), दीपक चव्हाण ( जय महाराष्ट्र ), सरफराज सनदी (मी मराठी) नामदेव भोसले (दै.महाराष्ट्र टाइम्स), कुलदीप देवकुळे (बालाजी न्यूज), डी. डी. पाटील (दै. सकाळ),शंभूराज काटकर (कृष्णाकाठ), दरीकांत माळी (दै. तरुण भारत), महादेव केदार ( दै.पुण्यनगरी), चंद्रकांत गायकवाड (दै.अग्रदूत), इम्रान मुल्ला (दै. लोकसत्ता), संतोष भिसे (दै. सकाळ), शरद सातपुते( सी न्युज ), सुरेंद्र दुपटे ((दै. लोकमत),सचिन ठाणेकर (दै. तरुण भारत),सतीश भोरे (दै.अग्रदूत), शहाबाज मूतवल्ली (बालाजी न्युज), अमोल खटावकर (दै. तरुण भारत),शंभूराज काटकर (कृष्णाकाठ), शैलेश पेठकर (दै. सकाळ), किरण जाधव ( काली गंगा),, सुधीर मोहिते (दै. महान कार्य ),निलेश माटले (दै. तरुण भारत), योगेश मानके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here