पत्रकारा वरील हल्ले आणि धमक्या सहन केल्या जाणार नाही :- पोलीस अधीक्षक दत्तात्रये शिंदे :
———————————————-
सांगली :- पत्रकारा बरोबरच त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा ही महत्वाची असून त्यांच्या वरील हल्ले आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रये शिंदे यांनी दिला आहे.
आष्ठा येथील पत्रकाराना धमकी दिल्या प्रकरणी पोलीस उपअधीक्षकांच्या मार्फत चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, तसेच जत मधील पत्रकाराच्या मुलावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, यातील हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. असं आश्वासन ही पोलीस अधीक्षक दत्तात्रये शिंदे यांनी यावेळी दिले.
पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन धमकी देणारे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या वर कारवाई करावी आणि जत येथील पत्रकाराच्या मुलावर हल्ला कारणाऱयां वर कडक कारवाई करावी, या बाबतच निवेदन आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक दत्तात्रये शिंदे यांना देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी पत्रकाराना आश्वासन दिल.
यावेळी पुढारीचे आवृत्ती प्रमुख चिंतामणी सहस्त्रबुद्धे, सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, पुढारीचे अमृत चौगुले, झी 24 तासचे रवींद्र कांबळे, जय महाराष्ट्रचे दीपक चव्हाण, सकाळचे घनश्याम नवाथे, पुढारीचे जालिंदर हुलवान, पुढारीचे अभिजित बसुगडे, लोकमतचे शीतल पाटील, ए बी पी माझाचे कुलदीप माने, जागरच्या शर्वरी पवार, एन डी टी व्हीचे रॉबिन्सन डेव्हिड, महाराष्ट्र वनचे संजय देसाई, बालाजी न्यूजचे शँकर देवकुळे, मी मराठीचे सर्फराज सनदी, तरुण भारतचे रावसाहेब हजारे, तरुण भारतचे दारिकांत माळी, पुण्यनगरीचे महादेव केदार, पुण्यनगरीचे राम वाघमारे, जनप्रवासचे शरद पवळ, पुढारीचे विवेक दाबोळे, सकाळचे बलराज पवार, पुण्यनगरीचे प्रवीण शिंदे, महाराष्ट्र टाईम्सचे नामदेव भोसले, सकाळचे शैलेश पेटकर, जनप्रवासचे विक्रम चव्हाण, लोकमतचे शरद जाधव, पुढारीचे उत्तम कदम, सकाळचे तानाजी टकले, पुण्यनगरीचे तुकाराम धायगुडे, सकाळचे योगेश घोडके, पोलीस टाइम्सचे किशोर जाधव, बालाजी न्यूजचे कुलदीप देवकुळे, प्रतिध्वनीचे प्रसाद भोसले, भारतीय जनमतचे गजानन पाटील, सी न्यूजचे स्वप्नील एरंडोलीकर, गर्जा महाराष्ट्रचे अरुण मोडक, सकाळचे फोटोग्राफर उल्हास देवळेकर, लोकमतचे फोटोग्राफर नंदकिशोर वाघमारे, पुढारीचे फोटोग्राफर सचिन सुतार, ए बी पीचे क्यामेरामन प्रथमेश गोंधळी, महाराष्ट्र वनचे कॅमेरामन सुजित दोडके,जागरचे कॅमेरामन जमीर रहिमतपूरे, जागरचे कॅमेरांमन गफार मुल्ला आदी यावेळी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील पत्रकार आणि विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Home मिडियावरील हल्ले महाराष्ट्र पत्रकारा वरील हल्ले आणि धमक्या सहन केल्या जाणार नाही :- पोलीस अधीक्षक...