डॉ.गोविंद पानसरे हत्त्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या डॉक्टर विरेंद्र तावडे याच्या पनवेल येथील घरासह पनवनेलनजिकच्या सुखापूर येथील सनातन आश्रमाची एसआयटीने सोमवारी रात्री उशिरापर्यंत झडती घेतली.तावडेचा सनातनमधील सहभाग, संस्थेचा रेकॉर्डही तपासून पाहण्यात आला.तसेच साधकांकडेही चौकशी केली गेली.अप्पर पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या नेतृतवखाली पथकाने ही झडती घेतली। तावडेचा आश्रमातील वावर,त्याच्यावरील जबाबदार्या,आश्रमातील त्याच्या वास्तव्याचा कालावधी,साधकाशी असलेले त्याचे संबंध,सनातनमधील सहभाग कश्या पध्दतीचा होता याबाबतची माहिती पोलीस तपासत आहेत.तावडेच्या घरातील झडतीत काही आक्षेपार्ह पुस्तके आण नोंद वहया सापडल्याचे समजते। . मिळालेल कागदपत्रांचा तपशील पोलिसांनी गुप्त ठेवला असला तरी तावडेवरील संशयाला बळकटी देणारे पुरावे एसआयटीला मिळाल्याचे सांगीतले जात आहे .सीबीआयने ही यापुर्वी तावडेच्या घराची झडती घेऊन काही पुरावे जमा केले होते. रविवारी रात्री पोलिसांनी तावडेला पनवेलला आणले.त्यानंतर पोलिसांनी तावडेचे घर आणि सनातन संकुलाची झडती घेतली गेली.आज पोलीस तावडेला घेऊन पुन्हा कोल्हापूरला जाण्याची शक्यता आहे.