महाड दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण होत असला तरी या दुर्घटनेतील दुःख आठवणींचा विसर अद्यापही रायगडवासियांना पडलेला नाही.मात्र एवढी मोठी दुर्घटना झाल्यानंतर सरकारने अन्य पुलांच्या बाबतीत ज्या तातडीने सुरक्षेचे उपाय करणे अपेक्षित होते ते होताना दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.पनवेलच्या गाढी नदीवरचा ब्रिटिश कालीन पूल असो की,काळ नदीवरचा पूल असो,कोलाड आणि माणगाव नजिकचे पूल असोत की नागोठण्याजवळचा आंबा नदीवरचा पूल असो या पुलाला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होताना दिसत आहे.जेथे दुर्घटना घडली तेथे तीन पदरी दोन पूल उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असला तरी जिल्हयातील अन्य जुन्या पुलांच्या बाबतीत अद्याप असा प्रयत्न होताना दिसत नाही.मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने झाले तर नवे पूल तेथे टाकले जातील पण हे कामही संथ गतीने सुरू असल्याने आणखी किमान दोन-तीन वर्षे तरी रायगडवासियांना जुन्या पुलांवरून जीवमुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार अशी चिन्हे आहेत.-