‘प्रिन्ट मिडिया’तही भरभरून कव्हरेज..

0
1113

महाड दुर्घटनेचे कव्हरेज काल दिवसभर बहुतेक मराठी वाहिन्यांवर लाईव्ह होते.इंग्रजी वाहिन्यांनीही त्याची दखल घेतली होती.प्रिन्ट मिडियानेही महाडच्या दुर्घटनेचं प्रचंड कव्हरेज दिल्याचं आजच्या विविध अंकांवर नजर टाकल्यानंतर दिसून आलंय.बहुतेक मराठी पत्रांनी महाडच्या घटनेवर अग्रलेख लिहिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सने पूल कोसळून 31 बेपत्ता या मथळ्याखाली सविस्तर बातमी दिली आहे.सावित्रीचा धडा या शिर्षकाखाली मटाने महाड घटनेवर अग्रलेखही लिहिला आहे.लोकसत्ताची मांडणी छान आहे.मरणसेतू अशा मोजक्या शब्दात शिर्षक दिले गेले असून सविस्तर वृत्तांतही दिला गेला आहे.बुडती हे जन या मथळ्याखाली लोकसत्तानं महाड घटनेवर भाष्य केलं आहे.सकाळनं काळरात्र असं समर्पक शिर्षक देऊन अंक सजवला आहे.क्षणात कोसळे पुलाचा डोलारा हा अग्रलेखही सकाळने लिहिला आहे. सामानाची मांडणी,आणि शिर्षक समर्पक आहे. महा’ड’ प्रलय असं शिर्षक आहे.30 बेपत्ता झाल्याचं सामनाचं म्हणणं आहे.मृत्यूचे पूल या मथळ्याखाली सामनाने अग्रलेख लिहिला आहे.प्रहारने आमावस्येच्या काळरात्री सावित्रीचा कोप असं लांबलचक हेडिंग बातमीला दिलं आहे.प्रहारमध्ये अग्रलेख नाही याचं नक्कीच आश्‍चर्य वाटलं.दीव्य मराठीनं व्यवस्थित बातमी दिली आहे.मराठी प्रमाणेच इंग्रजी दैनिकांनीही घटनेची ठळक दखल घेतली आहे.हिंदुस्थान टाइम्सनंBridge Falls – 29 feared Dead  अशी शिर्षक असलेली बातमी दिली आहे.एचटीनं बातमीची सेकंड लिड केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने  At least 30 Missing as century old Mumbai_Goa bridge is washed away असा मथळा देऊन बातमी अँकर म्हणून प्रसिध्द केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं Over 20 Feared dead as bridge on Mum-Goa highway washed away  असा मथळा देत बातमीची सेकंड लिड केली आहे.हिंदी दैनिकांनीही बातमीची ठळक नोंद घेतली आहे.या सर्वात एक गोष्टीत मात्र साम्य दिसले.बहुतेक नव्हे तर सर्वच वर्तमानपत्रांनी हेलिकॉफ्टरमधून घेतलेला फोटोच छापला आहे.फोटो ज्यानं कुणी काठला असेल तो असो पण तो फोटो घटनेची भयावहकता दाखविण्यास पुरेसा आहे.छायाचित्रकाराचे अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here