रूग्णालयातही ‘शंकर’ची ससेहोलपटच…

0
1315

 पुन्हा एकदा शंकर साळुंके

कायदे,नियम जेनतेच्या सोयीसाठी असतात की जनतेला नाडण्यासाठी असा प्रश्‍न पडावा असा विदारक अनुभव आज दिवसभर आला.एखादया रूग्णाला मनोरूग्णालयात दाखल करायचे असेल तर त्यासाठी अन्य कागदपत्रांसोबतच कोर्टाची ऑर्डरही लागते.पुर्वी  कागदपत्रे दाखवून कुठल्याही रूग्णाला ही ऑर्डर पुणे कोर्टातून मिळत असे.  दोन महिन्यापुर्वी .म्हणे यात बदल केला गेला असून आता रूग्ण ज्या तालुक्यातून आलेला आहे त्या तालुक्यातील कोर्टाचीच ऑर्डर अनिवार्य केली गेली आहे.हा नियम कोणी केला,? कश्यासाठी केला? तो रूग्णाला कळविण्याची काय व्यवस्था केली?  याची उत्तरं कोणाकडंच नव्हती.या बदललेल्या निर्णयाचा फटका वडवणी येथील पत्रकार शंकर सोळुंके याला बसला.त्याला घेऊन त्याचे दोन बंधू आज सकाळी सकाळी पुण्यात आले. रूग्णाला ओपीडीमध्ये तपासल्यानंतर त्याला अ‍ॅडमिट कऱण्याचा प्रश्‍न आला तेव्हा ‘तुम्ही तुमच्या तालुक्यातील कोर्टाची ऑर्डर आणली आहे काय”? असा प्रश्‍न विचारला गेला.शंकरच्या भावांना बदललेला हा नियम माहिती असण्याचे कारण नव्हते.हा विषय घेऊन मी,आणि पत्रकार शरद पाबळे,दिलीप खुराडे,गणेश सातव,सुनील वाळुंज सारे अधीक्षकांना भेटलो पण त्यांनीही कोर्टाकडं बोट दाखवत आम्हाला निरूत्तर केलं.तेथून आमची वरात पुणे कोर्टात गेली पण तिथंही जबाबदारी घ्यायला कोणीच तयार झाले नाही.अखेर शंकर साळुंकेला अ‍ॅडमिट न करताच आज परत जावे लागले .वडवणी ते पुणे हा 325 किलो मिटरचा प्रवास आहे.त्यासाठी गाडीवाल्याने 6000 रूपये घेतले.अन्य खर्च वेगळा.(गाडी खर्चासाठी शंकरच्या भावाकडे  पंधरा हजार रूपये दिले आहेत.) एवढं सारं होऊनही रूग्णाला कागदांचा बागुलबुवा दाखवून निर्दयपणे   परत पाठविले गेले.आता सोमवारी वडवणीच्या कोर्टातून शंकरचे नातेवाईक ऑर्डर मिळवतील आणि परत त्याला घेऊन पुण्याला येतील.म्हणजे उपचार सुरू व्हायला पुन्हा आठ दिवस जाणार आहेत.काल गाडीत शंकरचे हात-पाय बाधूनच आणले होते.जातानाही त्याच अवस्थेत न्यावे लागणार आहे.रूग्णमध्येच गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करतो.ही सारी परिस्थिती आम्ही संबंधित यंत्रणांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कोणाला पाझर फुटला नाही.हितसंबंध जपताना अनेक जण कायदे आणि नियम कसे धाब्यावर बसवित असतात ते आपण रोज पाहतो ,सामांन्य माणसाच्या बाबतीत मात्र नियमांवर बोट दाखवत मोठी अडवणूक केली जाते.आम्ही सारे पत्रकार असूनही हतबल झालोत.शंकर साळुंकेला अ‍ॅडमिट कऱण्यासाठी कोणी मदत करू शकेल काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here