75 वर्षांची दैदिप्यमान परंपरा आणि राज्यातील आठ हजार पत्रकार सदस्य असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यंाची एक महत्वाची बैठक काल पुणे येथील जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात झाली.बैठकीत 9 फेब्रुवारी रोजी परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेण्याचे नक्की झाले आहे.9 तारखेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तयाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.तसेच तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रत्येक तालुका संघ थेट परिषदेला जोडण्याबाबतचा आणि त्यानुषंगाने घटना दुरूस्ती कऱण्याचा निर्णय़ घेतला जाण्याची शक्यता आहे.बैठकीस प्रत्येक जिल्हा अध्यक्ष आणि परिषद प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष किऱण नाईक,कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे आणि सरचिटणीस संतोष पवार यांनी केले आहे.
राज्यातील अनेक जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुका झालेल्या नाहीत.अशा जिल्हा संघांनी तातडीने निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जे संघ मुदत संपल्यानंतरही निवडणुका घेत नाहीत अशा जिल्हा संघांवर कडक कारवाई करण्याचे बैठकीत नक्की करण्यात आले.
बैठकीत जालना आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम नक्की कऱण्यात आला.नांदेडची निवडणूक 16 फेब्रुवारीला होत आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बापू गोरे हे नांदेड निवडणुकांसाठी निरिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
बैठकीच्या आरंभी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे आणि नामदेव ढसाळ यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीस सर्वश्री एस.एम.देशमुख,सुभाष भारव्दाज,शरद पाबळे,बापू गोरे,राजेंद्र कापसे,सुनील वाळूज,राजेंद्र कापसे,केशव घोणसे पाटील,चारूदत्त चौधरी आदि उपस्थित होते.