मुंबई दिनांक 21 ( प्रतिनिधी ) मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचे पुरस्कार वितरण आणि तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्षांचा दुसरा मेळावा रविवार दिनांक 9 जून 2019 रोजी बीड जिल्हयातील वडवणी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.राज्यभरातून 800च्यावर पत्रकार या मेळाव्यास आणि पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहतील असा विश्‍वास परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात 35 जिल्हा संघ आणि 354 तालुका पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न आहेत.या संघांच्यावतीने दरवर्षी राज्यभरात विविध सामाजिक तसेच पत्रकारांच्या हिताचे उपक्रम सुरू असतात.ग्रामीण भागात आदर्श कार्य करणार्‍या या संघांच्या कार्याची दखल महाराष्ट्र पातळीवर घेतली जावी यासाठी गेली चार वर्षे राज्यातील आदर्श जिल्हा संघांना स्व.रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि स्व.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.या पुरस्कारांचे वितरण जाणीवपूर्वक ग्रामीण भागात करण्याचा पायंडा परिषदेने पाडलेला आहे..यापुर्वी गेल्यावर्षी हा कार्यक्रम सातारा जिल्हयातील पाटण येथे झाला होता . या वर्षी हा सोहळा बीड जिल्हयातील अविकसित आणि दुष्काळी वडवणी तालुक्यात घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.वडवणी हा नव्यानेच स्थापन झालेला तालुका असून बीड-परळी मार्गावर बीडच्या पुर्वेला 30 किलो मिटर अंतरावर आहे। मराठवाडा दुष्काळाशी झूंज देत आहे.राज्यभरातील पत्रकारांना या निमित्तानं दुष्काळाची दाहकता बघता येणार आहे.सोहळा दोन सत्रात होणार आहे.सकाळी 10 वाजता हा सोहळा सुरू होईल.पहिल्या सत्रात मेळावा आणि दुसर्‍या सत्रात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या सोहळ्यास मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मराठी पत्रकार परिषदेच्या सोमवारी मुंबईत झालेल्या महत्वाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते. यावेळी परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष विजय दगडू,विभागीय सचिव विजय जोशी,आण्णासाहेब मारगुडे बापुसाहेब गोरे,सोशल मिडिया सेलचे सुनील वाळुंज तसेच विविध जिल्हयांचे अध्यक्ष,परिषद प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पुरस्कारांची घोषणा यापुर्वीच करण्यात आली आहे.ती नावे खालील प्रमाणे आहेत.या खालील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांनी आणि तमाम सदस्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन मेळाव्याचे संयोजक असलेल्या वडवणी तालुका मराठी पत्रकार संघाने केले आहे.या मेळाव्यासंबंधी अधिक माहितीसाठी अनिल महाजन 9922999671 अनिल वाघमारे 8446491111 जानकीराम उजगरे ९४२३२११६१५ आणि बाबूराव जेठे ९०११९९१८१६ यांच्याशी संपर्क साधता येईल.

1) रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ
2) वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
1) पुणे विभाग : करमाळा तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा सोलापूर

२) कोकण विभाग : वाडा तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पालघर

३)नाशिक विभाग : तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा नंदूरबार

४) कोल्हापूर विभाग :कागल तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा कोल्हापूर

५) लातूर विभाग : कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा हिंगोली

६) औरंगाबाद विभाग ः आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, जिल्हा बीड

७) अमरावती विभाग : मालेगाव तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा वाशिम

८)नागपूर विभाग : चामोरशी तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here