अधिस्वीकृती समिती आणि पराडकरांचं पत्र

0
1485

दि.26 मार्च 2016

मा.श्री.एस.एम.देशमुख सर
अध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद
सप्रेम नमस्कार !
विषय :- अधिस्विकृती धारक पत्रकारांच्या एस.टी.पास नुतनीकरणाबाबत……..
महोदय ,

      सर ,  अधिस्विकृती धारक पत्रकारांना राज्य परिवहन मंडळातर्फे मोफत एस.टी.प्रवासासाठी पास दिला जातो.या पासची मुदत दरवर्षी 31 मार्च रोजी संपते.वस्तूत: सदर पासचे नुतनीकरण 31 मार्च पुर्वी किंवा 31 मार्च पर्यंत होण आवश्यक असते.या वेळची अधिस्विकृती राज्य समितीची सभा 27 मार्च रोजी असल्याने या सभेचे इतिवृत्त जिल्हा माहिती अधिका-यांकडे येण्यास किमान 10 एप्रिल ही तारीख उजाडेल.जो पर्यंत इतिवृत्त येत नाही तो पर्यंत एस.टी.वा रेल्वे पास नुतनीकरणासाठी आवश्यक पत्र देण्यास जिल्हा माहिती अधिकारी तयार होत नाहीत.
वस्तूत: 27 मार्च रोजी होणा-या राज्य समीतीच्या बैठकीत कोणाचे प्रस्ताव फेटाळले गेलेत , कोणाचे प्रलंबित ठेवण्यात आलेत याची सविस्तर माहिती विभागीय माहिती अधिका-यांना असणार आहे.माझी आपणास विनंती आहे की , उद्याच्या बैठकीत आपण फेटाळलेले वा प्रलंबित ठेवलेले अथवा नवीन प्रस्ताव सोडुन अन्य सर्व अधिस्विकृती धारक पत्रकारांना एस.टी.अथवा रेल्वे पास नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक पत्र 29 मार्च रोजी तातडीने देण्याच्या सूचना द्याव्यात.माहिती अधिका-यांनी पत्र उशीरा दिले तरी एस.टी.प्रशासन पास 1 एप्रिल पासूनच देणार असल्याने हे पत्र 29 मार्च रोजी दिले गेले तर ग्रामीण भागात वार्तांकनासाठी फीरणा-या बातमीदारांना त्याचा लाभ होवू शकेल.
माहिती अधिकारी प्रत्येक वेळी नियमावर  बोट ठेवतात.जर नियम पाळायचे असतील तर पासाची मुदत संपण्याआधी पत्र देण्याकरीता बैठकीचे इतिवृत्त पोहचणे आवश्यक असेल , तर बैठक 31 मार्च पुर्वी पंधरा दिवस संपन्न होणे आवश्यक होते.रत्नागिरी जिल्ह्यातील अधिस्विकृती धारक सर्व पत्रकारांची आपल्याला विनंती आहे की , उद्याच्या राज्य समीतीच्या बैठकीत एस.टी.आणि रेल्वे पास नुतनीकरणाचे पत्र 29 मार्च रोजी कोणतीही टाळाटाळ न करता देण्याच्या सूचना आपण विभागीय माहिती अधिका-यांना द्याव्यात ही नम्र विनंती.

आपला
जे.डी.पराडकर
दीपक शिंगण

—————————————————————————————————————————————————————————————————————

या शिवाय अधिस्वीकृती पत्रिका किमान एक महिना अगोदर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडं जमा कराव्या लागतात.त्या नुतनीकरण करून कधी परत मिळतील याची कोणतीही नक्की तारीख नसते.त्यामुळं अधिस्वीकृती असूनही किमान दीड दोन महिने विना कार्ड फिरावे लागते.रेल्वे प्रवासात किंवा मंत्रालयात प्रवेश मिळविताना याचा त्रास नक्कीच होतो.हे अधिकार्‍यांना चांगलं माहिती असलं तरी त्यावर कोणीच तोडगा काढत नाही किंवा बोलतंही नाही.उद्याही यावर काही होईल आणि पराडकरांची सूचना मान्य होईल याची सुतराम शक्यता नाही.

एस।एम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here