ठाणेदाराची दंडेलशाही.

0
1355

मंगरूळपीर येथील ठाणेदाराने पत्रकाराला बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवले,ही बातमी शहरातील पत्रकारांना समजल्यानंतर सारे पत्रकार एकत्र आले आणि अनेक घडामोडीनंतर त्या पत्रकाराची पोलिसाच्या तावडीतून नाट्यमय रित्या सुटका झाली.पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल मंगरूळपीरच्या सर्व पत्रकारांना मनापासून सलाम.हा धडा सार्‍याच पत्रकारांनी घेतला पाहिजे.हा सारा प्रकार वाचण्यासारखा आहे

———————————————————————————————————————————————————–
अखेर नाट्यमय घडामोडीनंतर पञकार बाळासाहेब(बालु)काळे यांची पोलीसांच्या कचाट्यातुन सुटका..

मंगरुळपीर(प्रतिनिधी)—मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराच्या दंडेलशाहीने ञस्त झालेल्या नागरीकांच्या व्यथा आपल्या लेखणीतुन मांडनार्‍या पञकार बालु काळे(दै.लोकशाही वार्ता मंगरुळपीर प्रतिनिधी)यांना आज ठाणेदारांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून शारीरीक व मानसिक ञास देवून हुकुमशाहीचा प्रत्यय आनून दिला व शेवटी नाट्यमय घडामोडीतुन तालुक्यातील सर्व पञकारांनी संघटित होवुन अखेर ठाणेदारांच्या कचाट्यातुन पञकार काळे यांची सुटका केली.
सविस्तर वृत्त असे की,गेल्या दोन ते तिन महिन्यापासुन रुजु झालेले मंगरुळपीर पो.स्टे.ठाणेदारांच्या दंडेलशाहीमुळे अवघा तालुका दहशतीखाली वावरत आहे.किरकोळ गुन्ह्यातही संबधीतांना अमानूषपणे मारहान करन्यात ठाणेदार आधीपासुनच असुरी आनंद घेत आहेत.न्यायप्रविष्ठ प्रकरनेही धाकदडप करुन माघे घेन्यासाठी अनेकांना तंबीही दिल्याच्या तक्रारी आहेत,वृध्दांना व महीलांनाही ठाणेदाराकडून मारहाणीच्या घटना घडल्या असुन ठाणेदारांच्या मारहाणीचे व्हिडिओ,फोटो व्हांट्सअप व फेसबुकवर व्हायरल सुद्धा झाले आहेत.मंगरुळपीरच्या ठाणेदारांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर व मानवअधिकाराचे हनन होत असल्यामुळे दै.तरुणभारत,दै.लोकशाही वार्ता,दै.दिव्यमराठी मध्ये वेळोवेळी वृत्त सुध्दा प्रकाशित झालेत.यामुळे वरिष्ठाकडून लागलेल्या चौकशिच्या धाकाने व ठाणेदारांच्या विरोविरोधात लागलेल्या वृत्तामूळे मनात आकस धरुन आज दि.१२रोजी सकाळी१० वाजता मंगरुळपीर येथील आंबेडकर चौकातुन दै.लोकशाही वार्ताचे मंगरुळपीर प्रतिनिधी बालु काळे यांना ठाणेदारांनी जबरदस्तिने ऊचलुन नेले व पोलीस स्टेशनच्या एका खोलीत डाबले नंतर इतर पञकारांना याविषयी गोपनिय माहिती मिळाल्यानंतर काहींनी ठाणेदारास याविषयी विचारना केली असता मी कोनालाही ताब्यात घेतले नसल्याची खोटी माहीती दिली.काहींनी तर पोलीस स्टेशनमध्येहि प्रत्यक्ष जावुन पाहीले.परंतु ठाणेदाराच्या मनमानीपनाला व हुकुमशाही वृत्तिच्या बातम्या लोकशाही वार्ताने लावुन धरल्यामूळे संशय ठाम होता व पञकारास डांबुन ठेवल्याची माहीती ही खरी होती त्यामुळे सर्व पञकार संघटीत होवुन याविषयी वरिष्ठांना व लोकप्रतिनिधिंना याची माहीती दिली.नंतर वाशिमचे डिवाय एस पी मंगरुळला आल्यानंतर पञकार बालु काळेला मागच्या दरवाजातुन पोलीस जिपमध्ये बसवुन नेले हा सर्व प्रकार पञकारांच्या समक्ष झाला तरीही ठाणेदार खोटेच बोलत असल्याने व पञकारांच्या जिवित्वाचा धोका लक्षात घेता सर्व पञकार आलेल्या डिवायएसपी ला भेटायला गेले परंतु ठाणेदाराने मधेच अडवून भेटु दिले नाही त्यामुळे उपविभागिय पोलीस अधिकारी वाळके साहेबांना घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्याकरवी भेटन्याची परवानगी मागीतली पण तरीही ठाणेदार खोटेच बोलुन भेटन्यास अटकाव करीत होते परंतु उपस्थित जमलेल्या पञकारांनी आतमध्ये प्रवेश करुन घडलेला प्रकार सांगितला यावर ठाणेदारास डिवायएसपींनी विचारले असता मी कोनत्याही पञकारास अटक केली नसल्याची खोटी कबुली दिली त्या दरम्यान बालु काळे यांना पोलीस जिप मधुन आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक, अकोला चौक मध्ये फिरवुन असे शहरात फिरवुन शेवटी राञी आठच्या सुमारास शहराबाहेर नेवून थांबविले हा प्रकार कॅमेराबध्द करन्यासाठी व ठाणेदाराचा खोटारडेपणा ऊघड करन्यासाठी काही पञकार पोलीस जिपच्या मागे होते याची भणक ठाणेदारास लागल्यामुळे शेवटी काळे यांना सोडुन देन्यास सांगितले त्यानंतर काळे यांना घेवून सरळ डिवायएसपी व ऊपविभागीत पोलीस अधिकार्‍यांच्या समोर प्रत्यक्ष नेवुन हा नाट्यमय प्रकार कथन केला.सकाळपासुन खोट्या बोलनार्‍या ठाणेदाराचा खोटारडेपणा उघड झाल्यानंतर ठाणेदाराची तारांबळ ऊडाली सकाळपासुन पकडून नेवुन ञास देवुन व धाकदडप करुन बिना पानी ठेवुन ठाणेदाराने अमानूष अत्याचाराची लेखी कैफीयत दिली.बालु काळे यांचेवर खोटी केस लावुन कोर्‍या कागदावर सह्या घेतल्याचेही समजले आहे.होनार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडनार्‍या पञकारावर असा अन्याय झाल्याने ही बातमी वार्‍यासारखी संपुर्ण तालुक्यात पसरली असुन मंगरुळपीर मध्ये सामान्य लोकांसोबतच पञकारांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाल्याने तालुक्यात आणखिनच दहशत पसरली आहे.याप्रकरणावर वरिष्ठाकडून ठाणेदारावर कारवाईचे संकेत असुन मंगरूळपीर तालुक्याहा ठाणेदाराच्या या ञासातुन लवकर मुक्त करुन त्यांचेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पञकारावरील या अमानुषतेचा सर्व क्षेञातुन ञिव्र निषेध होत असुन उद्या या झालेल्या अन्यायासंदर्भात ठैस पावले उचलनार असल्याचे सर्व पञकारांनी सांगितले.पञकार बालु काळे यांचे दोन मोबाईल फोन,पधराशे रुपये व पञकार ओळखपञ ठाणेदाराने जबरदस्तिने हिसकावुन घेतल्याचे काळे यांनी सांगितले.काही दिवसापुर्विच एका पञकाराला चार पोलीसांनी मारहाण केल्याची घटना घडली असुन त्या प्रकरनाची सुध्दा वरिष्ठाकडून चौकशी सुरु आहे.पञकारावर वाढता अन्याय लक्षात घेता ठाणेदारावर काय कारवाई होते याकडे मंगरुळपीर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here