नवी दिल्ली- 81 वर्षीय महिला पत्रकार रेखा दुग्गल यांचा खून कऱण्यापुर्वी त्यांच्यावर बलात्कार केला गेला होता.21 वर्षीय आरोपी निरज याने काल कोर्टात हे मान्य केलं आहे.न्यायालयाने निरजला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.न्या.अनु अग्रवाल यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
वृध्द महिला पत्रकारावर रेप केल्यानंतर त्या बेहोश झाल्या.आरोपीला वाटलं त्या मृत झाल्या.त्यामुळे पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने त्यांच्या अंगवार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर घरातील सोने घेऊन तो पसार झाला होता.
रेखा दुग्गल यांचे पती के के दुग्गल युएनआय या वृत्त संस्थेत संपादक होते.2005 मध्येच त्यांचे निधन झाले होते.