रायगड जिल्हयातील समुद्र किनारे परदेशी पाहुण्यांच्या आगमनाने गजबजून गेले आहेत.उरण भागात फ्लेमिंगो तर मांडवा,अलिबाग,मुरूड,श्रीवर्धन भागात सिगल पक्ष्यांचे थवे सध्या पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत.पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाबरोबरच पक्षी निरिक्षणासाठी तरूणांची पाऊले किनार्याच्या दिशेने वळताना दिसत आहेत.थंडीच्या मोसमात लडाख तसेच युरोप आणि रशियातील तापमान शुन्य अंश सेल्सियस पेक्षाही कमी असते त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात हजारो किलो मिटरचा प्रवास करून रायगडच्या किनार्यावर येतात .थंडीत आलेले हे पक्षी एप्रिल -मे च्या सुमारास पश्चिम किनारपट्टीचा निरोप घेतात असं पक्षी मित्रांनी सांगितले.–