रायगडात रस्त्यावर दररोज एक बळी

0
964
Medak: Scattered books and bags of students at the site of an accident where a train crashed into a school bus at Masaipet in Medak on Thursday. PTI Photo (PTI7_24_2014_000188B)

रायगड जिल्हयातील विविध रस्त्यांवर 2015 मध्ये 1 हजार 423 अपघात झाले असून त्यात357 जणांचा बळी गेले असून 1 हजार 213जण जखमी झाले आहेत.रस्त्यांची झालेली दुरावस्था,धोकादायक वळणे,वेगात जाणारी वाहनं ही अपघातांची कारणं असल्याचं सांगितलं जातं.रायगड जिल्हयातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग,मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग असे तीन महामार्ग जातात.या तीनही महामार्गावर मिळून जिल्हयाच्या हद्दीत 836 अपघात झाले असून त्यात 211 जणांचा बळी गेला आहे.728 जण जखमी झाले आहेत. आकडेवारीवर नजर टाकल्यास जिल्हयात दररोज चार अपघात होतात आणि त्यात किमान एक व्यक्तीचा बळी जातो आणि चारजण जखमी होतात. अपघात झाल्यानंतर तातडीने उपचाराची सोय नसल्याने मृत्युचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील रस्तयाचीं अवस्था काही वेगळी नाही. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यावर 587 अपघात झाले,त्यात 146 जणांचा मृत्यू आणि 485 जखमी झाले आहेत.– रायगड जिल्हयात रस्ता अपघातात 357 जणांचे बळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here