माध्यमातील महत्वाच्या घडामोडींची माहिती देणारं उद्याचा बातमीदार हे पोर्टल आम्ही 15 फेब्रुवारी 14 रोजी नव्यानं लॉंच केलं.पत्रकारितेतील सकारात्मक बातम्या,पत्रकाराच्या हक्कासाठीचे लढे,जगभरात पत्रकारावर होत असलेले हल्ले ,पत्रकारितेतील बदलते प्रवाह ,पत्रकारितेतीलन नोकरीच्या संधी आदिंची माहिती बातमीदारच्या माध्यमातून दिली जाते.एका विषयाला वाहिलेले हे पोर्टल आहे.हा विषयही जी मंडळी माहितीच्या जगतात वावरतात त्यांच्यासाठी म्हणजे पत्रकारांसाठी आहे.असं असतानाही पत्रकार आणि अन्य वाचकांनी बातमीदारचं उत्स्फुर्तपणे स्वागत केलं आह.गेल्या पाच महिन्यात बातमीदारला भेट देणाऱ्या वाचकांची संख्या 75,194 एवढी झाली आहे.म्हणजे दिवसाला सरासरी 500 वाचक बातमीदारला भेट देतात.वाचकाचं हे प्रेम आणि आपलेपणा आमचा उत्साह वाढविणारा आहे.सर्वांचे मनःपूर्वक आभार.thanx.
नित्य, नवे देण्याचा बातमीदारचा प्रय़त्न असतो.या संदर्भात कोणाला काही सूचना करायची असेल तर त्याचं स्वागत आहे.कारण बातमीदार कोण चालवतं याला महत्व नाही तर ते आपल्या सर्वांचं आणि आपल्या सर्वांसाठी चालविलं जातंय हे महत्वाचं असल्यानं बातमीदारचा प्रत्येक वाचक हा बातमीदारचा चालक आहे असं आम्ही मानतो.त्यामुळंच सूचना कऱण्याचा ,चांगली -वाईट प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार सर्व पत्रकार मित्रांना आणि अन्य वाचकांनाही आहे.अन हो आमचा ब्ला्रगही मागं नाही,आतापर्यत 30 हजार वाचकांनी ब्लॉगलाही भेट दिली आहे.
आपण बातमीदारला भेट दिलीत का ? नसेल तर आजच बातमीदारला भेट द्या.