पत्रकार पुन्हा रस्त्यावर
26 नोव्हेबर रोजी पत्रकारांचे राज्यभर धरणे आंदोलन
 
मुंबईः (प्रतिनिधी ) पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी,पत्रकार पेन्शन,छाटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे,अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे आणि मजिठियाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकारांच्या अन्य संघटनांच्यावतीने सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यभर जिल्हाधीकारी कार्यालया समोर सकाळी 11 -00 वाजे पासून धरणे अंदोलन करण्यात येणार असून सर्व पञकार संघटना व पञकार बांधवाणी या अंदोलनात सहभागी होऊन पञकाराची एकजूट शासनाला दाखवावी असे अवाहन मराठी पञकार परीषदेच्या वतीने एस एम देशमूख यांनी केले आहे .
पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नाही,पेन्शनची घोषणा झाली पण अजून त्याचीही अंमलबजावणी नाही,छोटया वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ते छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीनं आखले गेले आहे त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसणार आहे,मजिठियाच्या अंमलबजावणीबाबतही आनंदी आनंद आहे.सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करीत नसल्यानं राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे.तो व्यक्त करण्यासाठी सोमवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करतील.आपल्या भागातील आमदारांना भेटून पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याबाबत विनंती करतील 26 तारखेला छोटया आणि जिल्हा वृत्तपत्रांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर अग्रलेख लिहून शासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडं वेधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केले आहे.. 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत.आता थेट रस्त्यावर उतरून पत्रकार आपला आक्रोश जनता आणि सरकारच्या कानावर घालणार आहेत.
देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडं केलं जाणारं दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे.सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आपसातील वाद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे हे अंदोलन राज्यभरात पञकाराचे नेते एस एम देशमूख यांचे नेतृत्वा खाली हे अंदोलन करण्यात येणार असून या अंदोलनात मोठ्या संख्येने पञकार बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पञकार परीषदेचे विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा कार्याध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस अनिल महाजन कोषाध्यक्ष शरद पाबळे सर्व पदाधीकारी यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here