रायगड जिल्हयातील नागोठणे जवळ झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना आणि जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर झालेली मदतीची रक्कम रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकं डं प्राप्त झाली असून ती ंसंबंधितांना प्रांत आणि तहसिलदारांच्या मार्फत तातडीनं देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात22 जण ठार झाले असून त्यात रायगड जिल्हयातील 8,रत्नागिरी जिल्हयातील 7,ठाणे जिल्हयातील 1 आणि ओळख न पटलेले 4 मृत आङेत.रोहा,अलिबाग,नागोठणे ,सायन आदि ठिकाणी 52 जण उपचार घेत आहेत.129 व्यक्तींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणं 20 मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 40 लाख रूपये तर 63 गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपयांप्रमाणं 31 लाख 50 हजार रबपये अशी एकूण 71 लाख 50 हजारांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडं उपलब्ध झाली आहे.ती तातडीनं संबंधितांना वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.