जगेंद्रसिंगला न्याय मिळवून देण्यासाठी आता युपीतील पत्रकार संघटनांनीच पुढं आलं पाहिजे.

0
1073

नेहमी असंच होतं.हल्लेखोर,मारेकरी,असतात शक्तीशाली,धनिक,वजनदार .त्यामुळं क्राईम करूनही त्या खटल्याचं दफन कसं करायचं हे त्यांना चांगलं ज्ञात असतं.उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथील पत्रकार जगेंद्रसिंग यांच्या हत्त्येनंतर असंच होताना दिसतंय ,जगेंद्रसिंग यांची त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून अत्यंत निर्दयपणे हत्त्या करण्यात आली.त्याचे पडसाद देशभर उमटले.सारा मिडिया रस्त्यावर आला.महाराष्टाताही याविरोधात निदर्शनं झाली.या खटल्याची साबीआय तर्फे चौकशी व्हावी अशी मागणी केली गेली.मात्र आता जगद्रंसिग  यांच्या कुटुंबियांनीच या प्रकरणी “सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नयेत” अशी भूमिका  घेतली  आहे.जगेंद्रसिंह याचं कुटुंब आपल्या पहिल्या भूमकेपासून पूर्णतः पलटले आहे.जगेंद्रसिंह हत्त्या कटात मंत्री राममूर्ती वर्मा यांचा हात असल्याचा आरोप आहे.अगोदर जगेंद्रसिहच्या कुटुंबियाचंही तेच मत होतं.आता जगेंद्रसिहचा मुलगा पुष्पेंद्रसिंग  यांनी मंत्री राममूर्ती वर्मा यांना क्लीन चिट दिली आहे.तो म्हणतो,”आपल्या वडिलांना चुकीची माहिती दिली गेली.त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात लिहावं म्हणून त्यांची दिशाभूल केली गेली”.सर्वाना ज्ञात आहे की,1 जून रोजी जेव्हा जगेंद्रसिंग  याची हत्त्या केली गेली तेव्हा त्यानं मृत्यूपलर्व जबानीत “वर्मा यांच्या सूचनेवरून काही पालिस अधिकारी आणि पोलिसांनी आपल्या ंअंगावर रॉकेल ओतून आपणास जाळल्याचे” सांगितले होते.एका अंगणवाडी सेविकाचे शारारिक शोषन आणि भ्रष्टाचाराचा प्रकरणात अडकलेल्या वर्मा यांच्या विरोधात आपण सातत्यानं लेखन केल्यानं संतापलेल्या मंत्र्यांनी आपल्याला ठार मारण्याची योजना आखल्याचंही गजेंद्रसिंहनं म्हटलं होतं.अगोदर गजेंद्रसिंगचं कुटुबियही याच मताचं होतं.त्यांनीही पहिल्या जबानीत असेच आरोप केले होते.त्यासाठी आंदोलनही केलं होतं.आता ते बदलले असतील तर त्यामागचं काऱण समजून घ्यावं लागेल.कुटुबियचं बदलंले म्हट्ल्यावर या खटल्यातली मुख्य साक्षादीर असलेली अंगणवाडी सेविकाही पलटली आहे.

 .पत्रकार गजेंद्रसिगनीच  मंत्र्यावर आरोप कऱण्याची आपणावर  जबरदस्ती केल्याचं त्या सेविकेचं म्हणणं आहे. अशा प्रकऱणात असं नेहमीच घडतं.त्याचं काऱण म्हणजे आर्थिक मदत देऊन पिडितांच्या नातेवाईकांची आणि साक्षीदारांची तोंडं बंद केली  जातात.या प्रकऱणात काय घडलं ते बघा.22 जून रोजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जगेंद्रसिंगच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तब्बल तीस लाख रूपयाची मदत जाहीर केली.(एखादया पत्रकाराची हत्त्या झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारनं मदत देण्याची ही पहिलीच घटना होती).एवढंच नव्हे तर दोन मुलाना नोकरी देण्याची घोषणाही त्यांनी केली होती.त्याना बंदुकीचं लाइसन्स देण्याचं आणि त्यांची वादात असलेली जमिन परत कऱण्याचं आश्‍वासनही दिलं गेलं.हे सरकारनं अधिकृतपणे जाहीर केलं.ज्यांच्यावर आरोप आहे त्या मंत्र्यांनी अशाच पध्दतीचा काही प्रयत्न केलाच नसेल असं नाही.मात्र त्याचा प्रयत्न कधी समोर येणार नाही.याचा परिणाम असा झाला की,आम्हाला या प्रकऱणात आता चैकशी नको,न्यायाचीही आमची मागणी नाही अशी भूमिका पुष्पेंद्रसिंग घेतली आहे.तीन स्थानिक आमदारांनी मंत्री वर्माच्या विरोधात माझ्या वडिलांचा हत्त्यार म्हणून वापर केला असं चिरंजीव आता म्हणतात.माझ्या वडिलांनी वर्माच्या विरोधात लिहावं म्हणून या तीन आमदारांनी त्याच्यावर जबरदस्ती केली होती असंही पुप्पेंद्र आता म्हणतोय.जगेंद्रच्या कुटुंबियांनी तीस लाख कधी बघितले असण्याची शक्यता नाही.त्यांनी स्वाभाविकपणे असाही विचार केलेला असू शकतो की,सारी यंत्रणा वर्माची पाठराखण करतेय.देशभर बोंब होऊनही वर्मा यांची मंत्रिमडळातून हकालपट्टीही होत नाही अथवा त्याला अटक ही होत नाही .  त्यामुळ आपणास न्याय मिळेलच याची खात्री नाही.शिवाय अगदी वर्माला अटक झाली तरी जे नुकसान झालंय ते परत येणार नाही.त्याबदल्यात जे कधी पाहिलं नाही असं प्रचंड काही मिळत असेल,त्यातून पुढील भविष्याची कायमची तरतूद होत असेल तर  गप्प राहणंच शहानपणाचं आहे असा विचार कुटुंबियांनी केला असेल तर ते व्यावहारिकदृष्टया समजण्यासारखं आहे..त्यातून न हा भूमिका बदल झालेला असू शकतो गजेंद्रचं कुटुबिय ज्या मानसिकतेतून जातंय ते बघता हे सारं होणं स्वाभाविक आहे.अनेक प्रकरणात असंच घडतं.पण युपीतील पत्रकार संघटनांनी मात्र याचा पाठपुरावा करून दोषीना शिक्षा होईल याची काळजी घेतली पाहिजे.हे प्रकऱण दडपून टाकण्यात युपी सरकार आणि वर्मा यांना यश आलं तर ती पत्रकार चळवळीची मोठीच हानी ठरेल यात शंकाच नाही.त्यामुळंचं कुटुंबिय पलटलं असलं तरी पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी मात्र याचा पाठपुरावा केला पाहिजे.

.आजच्या टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतची स्टोरी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here