मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूरनजिक
अपघात,6 जण ठार,एक जखमी
मृत्यूचा महामार्ग ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास शिवनेरी बस आणि मारूती कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत.यामध्ये कारमधील एकाच कुटुंबातील तीन पुरूष,एक महिला आणि एका मुलासह पाच जणांचा तेसच शिवनेरीमधील एका प्रवाश्याचा समावेश आहे.शिवनेरीचा चालक गंभीर जखमी झाला आहे.त्याला मुंबईस हलविण्यात आलं आहे.माणगाव तालुक्यातील इंदापूरनजिक रूद्रोली येथे ही घटना घडली.दुर्घटनाग्रस्त शिवनेरी पणजीहून मुंबईकडे जात होती तर कार विरूध्द दिशेने महाडकडे जात असताना हा अपघात झाला.अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचीच बाब झाली आहे.चौपदरीकऱणाचे काम वेगाने पुर्ण करावे अशी मागणी होत आहे.