वाळीत प्रकरणाने वृद्ध आईबाप सोसताहेत मानसिक यातना…पोटच्या दोन मूलांनी जमीनीसाठी टाकली वृद्ध आईबापांना वाळीत… भरडखोल कूणबी समाज पंचायतीचा अजब न्याय.. अजब न्यायाने वृद्ध नथूराम व लक्ष्मी घडशी बारा वर्ष खोल खोल भरडली जाताहेत.. रायगडातील भरडखोल गावातील ह्रदय हेलावणारी घटना… वृद्ध बापाने मोठ्या मुलासह केली पोलीस अधिक्षकांकडे तक्रार ….टिव्ही9 चा स्पेशल रिपोर्ट
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी जिची महती सांगितली जाते ती आई आणि मुलांसाठी तळमळणारा बापाच्या नशिबी समाजाला हाताशी धरून पोटच्या दोन मूलांमूळे सहा वर्षे वाळीत रहावे लागले आहे..तो दूर्दैवी बाप आहे नथुराम घडशी…रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातील हे ऐंशी वर्षाचे नथुराम दाम्पत्य गेली बारा वर्षे समाजाच्य. वाळीत समस्येत खोल खोल भरडले जात आहेत. त्यातील ही सहा वर्षे तर घरचेच वासे ठरलेत घरचेच भेदी….हिस्सा मागणा-या दोन पोरांनींच त्यांना वाळीत टाकली आहेत.
वयाच्या ऐंशी वर्षात तीन मुले, एक मुलगी आणि चार नातवंडे असणारे नथुराम घडशी आजही मोलमजूरी करतात. 2001 ते 02 सालात नथुरामाची मोठी सून हि देवदेवस्की करते असा बहाणा करीत भरडखोल येथील हिंदू कुणबी समाजाच्या जात पंचायतीने या घराला वाळीत टाकले होते. त्याची शहानिशा करताना सूनेसह नथुराम व त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिला गावात वावरणे शक्य होत नव्हते. याच जाचाला कंटाळून नथुरामाच्या मुठ्या मुलाने पनवेल गाठले. तो तिथे मोलमजचूरी करू लागला. त्याच्यापेक्षा लहान असलेल्या दोन भावंडांसाठी तो झटत होता. ती भावंडे मोठी होत होती. आणि दोन्ही मुलांनी गावातील ओळखीच्या मुलींबरोबर लग्न करण्याचा विचार केला. त्या विचाराला साथ देत नथुराम घडशींनी दोन्ही मुलांची लग्ने त्यांच्या मनासारखे थाटामाटात केली. आणि तिथेच दुस-या वाळीत प्रकरणाला सुरूवात झाली. वाळीत या जाचक समाजनियमांपासून सुटका करण्यास समाजप्रमुख काही तयार नव्हतेच.
नथुरामाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काही समाजबांधव सोडीत नव्हते. याचाच फायदा नथुरामाच्या पोटच्या दोन पोरांनी घेतला्. लग्न झाल्यानंतर ते गावातच वेगळा संसार थाटू लागले. आणि आम्हाला बापाचा हिस्सा पाहिजे असा तगादा समाजपंचायतीत त्यांनी सुरू केला. पण आपल्या कष्टावर प्रेम करणारा व कष्टाशी प्रामाणिक असलेल्या नथुरामाने तुमच्या लग्नाचं कर्ज कोण फेडणार अशा थाटात, सडेतोड उत्तर दिल्याने समाजपंचायतीने पुन्हा नथूराम दाम्पत्याला वाळीत टाकत नथुरामास कोंडीत पकडले आहे. आता ही कोंडी फोडण्यासाठी नथुराम सज्ज झालाय.
यातील लक्ष्मीबाईची कहाणी तर ह्रदयद्रावकच आहे. तिचं माहेरही भरडखोल आणि सासरही भरडखोल पण तिला ना माहेरी थारा अन् ना सासरी आसरा. पण नथुरामासारखा पौलादी पुरूष आहे म्हणूनचे तिचं खरं रक्षण होतेय. नाही तर एकेदिवशी तिला झोपेत दकडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण नथुराम बलवत्तर म्हणून ती वाचली
आता कोणासाठी जगायचं…. असा आक्रोश करीत लक्ष्मीबाई सारं सांगत होती.
ऐंशी वर्षात मोलमजूरी, मुलांचा थाटलेला संसार त्यात समाजप्रमुखांनी घातलेला घोळ, कर्मदरिद्री निघालेली पोटची पोरं इतक्या सा-या समस्येला तोंड देत नथुराम मात्र आजही लढाई जिंकण्यासाठी सज्ज आहेच. आता समाजाची साथ नही, मुलांची उब नाही अशा अवस्थेत आपलं पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतंय यावरच या वृृद्ध जोडप्याचं धैर्य वाढणार आहे. नाहीतर समाजाला किड़ लागलेली ही वाळीत समस्या कोणतं रूप धारण करेल याचा काही नेम नाही. पोरांनी टाकलेल्या या आईबापाची साथ देण्याकरीता चला पुढे या…..
दीपक शिंदे,महाड यांच्या वॉलवरून साभार