नाथाभाऊ-सुधीरभाऊंचं चाललंय काय ?

0
1634

देवेंद्र फडणवीस सरकारमधील एकनाथ खडसे असतील किंवा सुधीरङभाऊ मुनगंटीवार असतील हे मंत्री घुश्यात आहेत हे लपून राहिलेलं नाही.त्यांचा घुस्सा व्यक्तिगत कारणांसाठी आहे.दोघांनाही व्हायचं होत सीएम.बिचाऱ्यांनी ते कधी लपवूनही ठेवलं नव्हतं.तसे उघडपणे ते बोलले होते.नाथाभाऊंंनी तर शक्तीप्रदर्शन करीत गडकरींच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रय़त्न केला होता.त्यांना त्यात यश आलं नाही ही भाग वेगळा. मुख्यमंत्रीपद नसले तरी मंत्रिमंडळात दुसरं स्थान,महत्वाचं खातं,राहायला हवेशीर हवेली,चकाचक आणि जे हव ंहोतं ते ऑफिस एवढं सारं मनासारखं मिळाल्यावर तरी नाथाभाऊंनी समाधानी व्हावं ना.पण नाही पहिल्या दिवसांपासून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अपशकून करायला सुरूवात केलीय.मोठ्या मनानं फडणवीसांनी त्यांना पंढरपूरला पाठविलं तर “आषाढी वारीची पुजा करायला आपल्याला आवडेल” असं सांगून नाथाभाऊंनी मुख्यमंत्रीपद अजूनही स्वप्नात येत असल्याचं दाखवून दिलं.ते मिळावं यासाठी फोडणी दिली ती देखील जातीयवादाची.पण त्यांच्या या वक्तव्याची ना फडणवीसांनी फारशी दखल घेतली ना जनतेनं .मग नाथाभाऊ आणखीनच भडकले.त्यांनी मग हा राग बंगल्याच्या निमित्तानं  काढला,सहकारी मंत्री चंद्रकांत पाटील यांना “नया है वह”चा टोला लगावला.नंतर महसूल मंत्री दुुष्काळ दौऱ्यावर गेले.पाहणी दौरा होतो म्हणे तो.पण मंत्र्यांनी पाहणी कश्याची केली आणि त्यात त्यांना काय आढळून आलं कळायला मार्ग नाही.जालन्यात आणि अन्यत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरी जेवणावळी मात्र यथासांग झाल्या.हे सारं कमी होतं म्हणून की,काय त्यांनी “मोबाईल डिस्कनेक्ट होऊ नये म्हणून शेतकरी हजार रूपयाचं बिल जर भरत असतील तर मग लाईट बील भरायला त्याना काय झालं?” असा आडमुठा सवाल केलाय.नवे महसूल मंत्री अजित दादांच्या मार्गानं जात आहेत हे दाखविणारं खडसेंंचे हे विधान आहे.मुळात हजार रूपये कोणता शेतकरी मोबाईलचं बिल भरतो ते त्यानी सांगावं आणि अशा “श्रीमंत” शेतक़ऱ्याला माध्यमांसमोर आणावं.हजार रूपये बिल भरण्याची जर शेतकऱ्यांची ऐपत असेल तर आत्महत्या करायला त्यांचा जीव काय वर आलाय.? बर वीज बिल तरी काय म्हणून भरायचं.? मराठवाडा आणि राज्याचा अनेक भागात वीस वीसताल वीजेचा पत्ता नसतो.अगोदरच दुष्काळ आणि वीज नाही म्हटलयवर शेत पिकाची वाट लागलीय.वीज बिलाची अपेक्षा कऱणारांनी ती पूर्ण वेळ आणि पुरेशया प्रमाणात द्यायला हवी.पण त्यावर कोणी बोलत नाहीत.”वीज बिल देत नाहीत म्हणून वीज देणार नाही ” म्हटलं की,प्रश्नातून सुटका होते तो प्रकार.अशा भाषणबाजीनं सरकार अडचणीत येतंय असं दिसतंय.अशी विधानं करून सरकार बदलंलंय याचीच जर जाणीव होणार नसेल तर मग मागचे काय वाईट होते असं म्हणायची वेळ.

नाथाभाऊ आणि सुधीरभाऊंची राजकीय वक्तव्य शिवसेना सत्तेत येणार नाही यासाठी पुरक ठरत आहेत.”गीते दिल्लीच्या सत्तेत आङेत तोपर्यत महाराष्ट्रात युती आहे” असं भडकाऊ विधान खडसेंनी करून सेनेच्या जखमेवर मीठ रगडलं.सुधीरभाऊंनी “शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत” असं सांगून केवळ संभ्रम निर्माण केला नाही तर युतीची दारं बंद करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं.शिवसेनेबरोबर युती झाली तर फडणवीस सरकारला पाच वर्षे मरण नाही.देवेंद्रजी स्थिर झाले तर आपल्या स्वप्नाचं काय ? याची चिंता दोन्ही भाऊंना ग्रासतेय असं दिसतंय.अल्पमतातंलं हे सरकार असंच चालत राहिलं तर आपली अरेरावी खपवून घेण्याशिवाय देवेंद्रपतांसमोर पर्याय़ नाही हे दोन्ही भाऊ जाणून आहेत.देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा तर हा कार्यक्रम नाही ना?  अशी रास्त शंका आता यायला लागली आहे.मात्र या प्रयत्नात किमान नाथाभाऊ तरी स्वतःची अडचण करून घेत आहेत हेच दिसतंय.गेल्या काही दिवसात पंकजाताई गप्प आहेत.त्यांचा हा निर्णय परीपक्वपणाचा आहे असं म्हणता येईल.तावडेनेही आपल्या स्वभावाला मुरड घालत चिभेला विश्रांती दिली तेही नक्कीच त्यांच्या आणि पक्षाच्या हिताचं आहे. ( एस.एम,)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here