उत्कृष्ठ बातमीदार होण्यासाठी बातमी कुठे आणि कश्यात आहे हे जसं कळावं लागतं तव्दतच चांगला प्रेस फोटोग्राफर होण्यासाठीही शोधकदृष्टी असावी लागले.अँगल असावा लागतो.फोटो तर कोणीही काढू शकतो पण ज्याला दृष्टी असते तोच चांगला फोटोग्राफर होऊ शकतो.लग्नातले फोटो काढणं आणि प्रेस साठी फोटो काढणं यातही फार फरक आहे.जो संदेश हजार ओळीची बातमी देऊ शकत नाही तो संदेश एक चांगला फोटो अधिक परिणामकारक देऊ शकतो हे वास्तव आहे.फोटोंचं हे महत्व लक्षात घेऊनच आज अनेक दैनिकात फोटो एडिटरची नियुक्ती केली जाते.चांगला फोटोग्राफर होण्यासाठी पदवी तर आवश्यकच असते पण केवळ पदवी असून चालत नाही.फोटोग्राफी ही कला आहे आणि ती उपजतच असावी लागते.ज्यांच्याकडं हे उपजत ज्ञाऩ आहे तोच चांगला छायाचित्रकार होऊ शकतो.अशा छायाचित्रकांरामध्ये पुण्यातील एक छायाचित्रकार मित्र सुनील वाळुंज यांचा नक्की उल्लेख करता येईल.पुण्यातील काही मान्यवर आणि प्रतिष्ठित दैनिकात सुनील वाळुंज यांनी अनेक वर्षे फोटोग्राफर म्हणून काम केले आहे.याकाळात त्यांनी दिलेली अनेक छायाचित्र वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहेत.त्यांच्या उत्कष्ठ फोटोबद्दल त्यांच्या पाठीवर अनेक मान्यवरांची शाबासकीची थापही पडलेली आहे.आज ते दैनिकासांठी काम करीत नसले तरी फोटोग्राफीचा छंद त्यांनी आजही जाणीवपूर्वक जोपासला आहे.आता ते व्यावसायिक फोटोग्राफी करीत असले तरी निसर्ग त्यांना सातत्यानं खुणावत असतो .म्हणूच अचानक त्यांचा फोन येतो,चार दिवस जरा कोकणात जाऊन येतो. परतल्यानंतर वेगवेगळ्या अंगानं टिपलेला कोकणातील निसर्गच ते बरोबर घेऊन येतात.जम्मू-काश्मीर आणि अऩ्यत्रही त्यांची भटकंती सुरू असते.देशाच्या विविध भागात काढलेला फोटोंचा मोठा संग्रह सुनील वाळूंज यांच्याकडं आहे.
सुनील वाळुंज पत्रकार संघटना तसेच छायाचित्रकारांच्या संघटनेतही सक ्रीय आहेत.ते पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत.फोटोग्राफर असोसिएशनचे मार्गदर्शन ,मदत करण्याचे काम ते मनापासून करतात मनमिळावू,चांगला लोकसंग्रह ,निगर्वी,आणि संघटक असलेले सुनीळ वाळूंज कलावंताला साजेशे वृत्तीनं बिनधास्त आहेत.काही काळजी करू नका असा त्यांचा आवडता मंत्र आहे.हा मंत्र देताना कोणीही अडचणीत असेल तर अर्ध्यारात्री धावून जाण्याची त्यांची सवय नक्कीच त्यांच्याबद्दलचा स्नेह वाढविणारी ठरते.पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे असे अनेकदा सांगितले जाते.पत्रकारितेतील हे तत्वही वाळुंज निष्ठेनं पाळत असतात. एका सामांन्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुनील वाळुंज यांनी आपला सुस्वभाव आणि कलेच्या बळावर आपला एक चाहता वर्ग पुण्यात निर्माण केला आहे.
सुनील वाळुंज यांचा आज वाढदिवस आहे.ते पन्नास वर्षोचे झाले आहेत.त्यांना आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे आणि वेगळ्या वाटेनं चालणारा हा कलाकार नेहमी आनंदी राहावा एवढ्याच शुभेच्छा.
.