कोेकणात पुन्हा एकदा राजकीय धुमसान सुरूय.पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की,निवडणुका असोत नसोत कोकणात दर चार-दोन महिन्यात राजकीय “दंगल” होतच असते.निवडणुका आहेत म्हटल्यावर त्याची तीव्रता आणि व्याप्ती अधिक वाढते एवढंच.गेल्या पंधरा वर्षातला कोकणातला राजकीय घडामोडींचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की,कोकणातलं राजकारण व्यक्तीकेंद्री झालेलं आहे.इथं पक्ष आहेत पण ते दुय्यम बनलेेत.त्यामुळंच च र्चा किंवा वादही पक्षीय पातळीवर होण्याऐवजी व्यक्ती पातळीवर होताना दिसतात. कॉग्रेसचे नारायण राणे,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे तीन नेते प्रामुख्यानं या घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत.दीपक केसरकरांच्या निमित्तानं कोकणातील राजकीय क्षितिजावर आणखी एक भिडू पुढं आला आहे.त्यामुळं संघर्ष आता चौरंगी आणि अधिक टोकदार होताना दिसतोय.( एक काळ असा होता की,रायगडमधील शेकापचं राजकारण राज्याचं लक्ष वेधून घ्यायचं.जयंत पाटील शेकापचे सरचिटणीस झाल्यापासून ,त्यांच्या आत्मकेंद्री राजकारणानं पक्षाची पुरती वासलात लाऊन टाकलीय.त्यामुळं शेकाप आता जिल्हयातच अदखलपात्र पक्ष झाल्यानं शेकापबद्दल फार कोणी च र्चा करताना दिसत नाही.) – या चौरंगी संघर्षात प्रत्येकजण समोरच्याचं अस्तित्व संपवायला टपलेला आहे. भास्कर जाधव हे नारायण राणेंच्या डोळ्यात खुपत आहेत , दीपक केसरकरांना नारायणरावांचं अस्तित्व संपवायचं आहे. भास्कर जाधव आणि सुनील तटकरे हे एकाच पक्षातील दोन नेते असले तरी त्यांच्यातही अस्तित्वाचा आणि वर्चस्वाचा जीवघेणा संघर्ष सुरूय .नेत्यांमधील हा संघर्ष कशासाठी आहे?जनतेच्या प्रश्नांसाठी हे नेते परस्परांशी भांडताना कधीच दिसले नाहीत.स्वतःची संस्थानं टिकविण्यासाठी आणि त्यांचा विस्तार कऱण्यासाठीचा हा संघर्ष आहे.हे करीत असताना आपली मुलं जनतेच्या माथी मारण्याचा प्रय़त्न साऱ्याच नेत्यांकडून होताना दिसतोय. दृवतःच्या आणि मुलाबाळांच्या चिंतेने ग्रासलेल्या या सर्वपक्षीय नेत्यांना कोकणातील प्रश्नांची काळजी करायला मात्र जराही उसंत नाही. नारायण राणे असोत,भास्कर जाधव असोत,किंवा तटकरे नाही तर जयंत पाटील असोत या नेत्यांनी कोकणासाटी गेल्या पंधरा वर्षात काय केलंय? याचा लेखाजोखा काढायचा ठरविलं तर हाती काहीच लागत नाही. कोकणात फिरत असताना उ ग्र स्वरूपात समोर येणारे अनेक प्रश्न हेच दाखवून देतात.राज्याचं नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांनी आपल्या जिल्हयातील मुलभूत प्रश्नही निकाली लावलेले नाहीत.कोकणातील रस्तेही किमान चालण्यायोग्य असावेत असं या नेत्यांना कधी वाटलं नाही.कोकणातील पत्रकारांनी सतत पाच वर्षे थेट रस्त्यावर उतरून आणि केंद्राकडं पाठपुरावा करून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावला. आपण न केलेल्या या कामाचं श्रेय घेण्यासाठीही लोकसभेच्या वेळेस या नेत्यांची स्पर्धा लागली होती.वस्तुस्थिती अशी आहे की,पत्रकार लढा लढत असताना कोकणातील एकाही राजकीय पक्षानं या आंदोलनात सहभाग नोंदविला ऩाही अ थवा त्याला पाठिंबाही दिला नाही. रस्त्यांप्रमाणंच रोजगार,पर्यटन विकास,बंदर विकास,फळावर प्रक्रिया करणारे उद्योग याबाबत काही झालेले नाही.मोठ मोठे आकडे जाहीर करायचे आणि पाट्या लावायच्या हा कोकणातल्या राजकारण्यांनी नवा कोकण पॅटर्न निर्माण केलाय..कोकणात प्रवास करताना भूमीपूजनाच्या या पाट्या आपल्याला वाकुल्या दाखवत असतात.गरीब,कोकणी जनतेला थापा मारून सत्ता मिळवायची,सत्तेतून संपत्ती गोळा करायची आणि त्यातून मस्तीचं प्रदर्शन करायचं हे कोकणी राजकाऱण्यांचं सूत्र झालेलं आहे. भास्कर जाधव यांच्या पैश्याची मस्ती उतरविण्याची निलेश राणे यांनी केलेली भाषा हेच दाखविते.निलेश राणे यांची भास्कर जाधवांबद्दल जी तक्रार आहे तीच तक्रार भास्कर जाधवांची राणेंबद्दल,तटकरेंबद्दलही आहे.दीपक केसरकरांचंही राणे आणि अन्य नेत्यंाबद्दल हेच मत आहे.म्हणजे मस्ती या एका मुद्यावर सर्वांच एक मत दिसतंय.प्रसंगांनुरूप मस्ती उतरविण्याची भाषा केली जाते.लोकसभेपुर्वी राणे आणि केसरकर यांनी मस्ती उतरविण्याच्या भाषेचे आदान-प्रदान केले होते.निलेश राणेंनी आता भास्कर जाधवांची मस्ती काढली आहे.गुहागरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा निलेशरावंानी केली आहे.वास्तव असंय की,निलेश राणे गुहागरला जाऊ शकत नाहीत,तेथून ते निवडूनही येऊ शकत नाहीत,तरीही ते अशी घोषणा करीत असतील तर ते आणि त्यांचे पिताश्री दबावाचं राजकारण करीत आहेत हे नक्की.भास्कर जाधव यांच्यावर निशाना धरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचे नारायण राणे यांचे मनसुबे दिसतात.”कॉग्रेसच्या नेत्यांनी आपल्या मुलाबाळांसाठी तिकिटाचा आग्रह धरू नये” असे मत मागच्या आठवड्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं.म्हणजे निलेश राणे याचा पत्ता साफ कऱण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी आखली होती.त्यांची ही योजना अयशस्वी कऱण्यासाठी निलेश राणे यांनी गुहागरचं पिल्लू सोडलं आहे.गुहागर हा भास्कर जाधव यांचा मतदार संघ आहे,भास्कर जाधव आणि तटकरे यांंच्यात वाद असला तरी जाधव हे राष्ट्रवादीतील एक प्रभावी नेते आहेत हे नाकारता येणार नाही.राज्यात कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार आहे अशा स्थितीत निलेश राणे भास्कर जाधव यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज भरणार असतील तर ते राष्ट्रवादीवाले कधीच स्वीकारणार नाहीत.शनिवारी माणगावमधील कार्यक्रमात अजित पवार यांनी कॉग्रेसने राणे यांना आवरावे असे बजावले आहे.याचा सरळ अथ र् असा की, राणे जर भास्कर जाधव यांची कोंडी करणार असतील तर मग राष्ट्रवादी कोणत्याही थराला जाऊ शकते.हे वास्तव नारायण राणे आणि मुख्यमंत्री देखील जाणूनआहेत.त्यामुळं निलेश राणे हे अपक्ष म्हणून गुहागरमधून उभे राहणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांनी ध्यावीच लागेल. त्याबदल्यात मग अपवाद म्हणून का होईना निलेशरावांसाठी कुडाळ,कणकवली किंवा सिंधुदुर्गमधील अन्य एळाद्या मत दार संघाची व्यवस्था कऱणे भाग पडणार आहे..राणेंची हीच योजना आहे.नाक दाबून आपल्या मुलाला तिकीट मिळविण्यासाठी गुहागरचा कोलदांडा घातला गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी निमित्त पुढं केलं गेलंय ते भास्कर जाधवांनी लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळल्याचा.कोकणात आघाडी धर्म अनेकांनी पाळला नाही.ते कोण.कोण आहेत हे ही राणेंना माहिती आहे.तरीही ते जर भास्कररावांचीच कोंडी करू इच्छीत असतील तर त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतलाच पाहिजे..गुहागरचा कोलदांडा कशासाठी आहे हे मुख्यमंत्र्यांना नक्कीच माहिती आहे आणि त्यातून मार्ग काढणेही त्यांना क्रमप्राप्त असल्यानं विनय नातूंनी फार खूष होण्याच कारण नाही.निलेश राणे गुहागरमधून लढू शकत नाहीत,त्यांना तसं करूही दिलं जाणार नाही हे नक्की.गुहागरमधून निलेशला उभं कऱण्याचं आत्मघातकी पाऊल नारायण राणे यांनी उचललंतर त्यांचा कपाळमोक्ष ठरलेला आहे.कारण गुहागरमध्ये युतीचा प्रभाव आहे. गेल्या वेळेस विनय नातू आणि रामदास कदम उभे राहिल्यानं भास्कर जाधव यांना लॉटरी लागली .यावेळेस असं होणार नाही,गुहागरची जागा भाजपला सुटेल अशी शक्यता आहे.त्यामुळं निलेश राणे उभे राहिले आणि तिरंगी लढत झाली तर विनय नातूंना प्रचार करायचीही गरज भासणार नाही
निवारी माणगावमध्ये राष्ट्रवादीनं मेळावा घेतला.मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी “श्रीवर्धनकरांमुळेच सुनील तटकरेंचा पराभव झाला” असा निष्कर्ष काढला आहे.अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी श्रीवर्धनच्या तुलनेत अलिबागला मताधिक्य जास्त मिळाले आहे हे देखील अधोरेखीत केलं ..त्याच बरोबर सुनील तटकरे यांनी जिल्हयात पक्षाचं वर्चस्व वाढल्यानं पक्षाला सात पैकी चार जागा हव्या असल्याचं सांगितलं आहे.या दोन्ही वक्तव्यावर आता जिल्हयात उलट-सुलट च र्चा सुरू झालीय.अलिबागला मताधिक्य जास्त मिळाल्याबद्दल अजित पवारांनी कौतूक केल्यामुळं कॉग्रेस नेते मधुकर ठाकूर यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या दिसतात.याचा अ र्थ अजित पवार यांच्या वक्तव्यामागचा मतितार्थ त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही.अलिबागमध्ये आम्हाला मताधिक्य जास्त असल्याचं सांगत अलिबागच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न यातून साधलेला आहे.अलिबागमधून राष्ट्रवादीचे महेंद्र दळवी हे इच्छूक आहेत.त्यांच्यासाठी अजित पवारांनी अलिबागच्या कौतूकाची गुगली टाकलेली दिसते.सुनील तटकरे यांनी चार जागाची मागणी करण्य़ामागंही हेच गणित असावें.रायगडमध्ये श्रीवर्धन,कर्जत आणि महाडची जागा राष्ट्रवादीकडे होती.पेण,पनवेल,उरण,आणि अलिबागच्या जागा कॉग्रेसने लढविल्या होत्या.महाडमध्ये यावेळेस माणिक जगताप हे कॉग्रेसचे उमेदवार असतील.त्यामुळं ती जागाही कॉग्रेस सोडणार नाही.पनवेल,उरण आणि पेणवरही कॉग्रेसचाच दावा असेल.अशा स्थितीत अलिबागवर राष्ट्रवादी दावा सांगू शकते.त्यासाठी अलिबागच्या मताधिक्कयाचं कारण पुढं केलं जाऊ शकतं.अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या वक्तव्याचा तो अ र्थ निघतो.अलिबागची जागा मिळणार नसेल तर किमान जिल्हा परिषद अध्यक्षपद तरी पदरात पाडून घेण्याची ही दबावाची योजना असू शकते.
अजित पवारांच्या वक्तव्याचा आणखीही एक अ र्थ काढला जात आहे.सुनील तटकरे विधान परिषदेवर गेल्यानं श्रीवर्धनच्या जागेवर कोणी लढायचं हा कळीचा मुद्दा बनलेला आहे.े .या जागेसाठी सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे इच्छूक आहेेत हे साऱ्यांनाच माहिती आहे..मात्र .श्रीवर्धन मधून आपली कन्या आदिती तटकरे यांनी निवडणूक लढवावी अशी सुनील तटकरे यांची इच्छा आहे.त्यामुळ “पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचा” प्रय़त्न झालेला असावा अशी च र्चा रायगडात रंगली आहे. अवधूत तटकरे हे रोह्याचे नगराध्यक्ष आहेत मात्र या रोह्यातच सुनील तटकरेंना कमी मतं पडली आहेतअजित पवार यांनी हे जाहीरपणे सांगून त्याची प्रायश्चित घ्यायला अवधूत तटकरेंनी तयार राहावं असं सूचित केलं आहे.या सर्व शह आणि काटशहांचा अथ र् एवढाच की,येत्या काही दिवसात कोकणची पवित्रभूमी व्यक्तीगत महत्वाकांक्षेनं झपाटलेल्या राजकीय नेत्यांच्या कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.यातील काही कुस्त्या नुरा कुस्त्याही असतील पण त्या तशा दिसणार नाही याची काळजी घेतली जाईल.पक्ष,नेते,आणि कुटुंबातील या संघर्षात कोकणातील सामांन्यांच्या जीवनमराणाचे प्रश्न कुठं लुप्त होतील ते कोणाला समजणार देखील नाही.पात्र बदलली असतील पण गेली पन्नास वर्षे कोकणात हेच तर सुरूय.
एस.एम.देशमुख