मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खालापूर टोल नाक्यावर आज दुपारी बस मधून प्रवास कऱणाऱ्या दोन प्रवाश्यांकडून 40 लाख रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मुंबई-कोल्हापूर बसमधून दोघेजण मोठी रक्कम घेऊन प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर खालापूर टोल नाक्यावर पोलिसांनी बसमधील रक्कम जप्त केली.सदर रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी सांगली जिल्हयातले आहे.