ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर निवडणुकीच्या मैदानात आहेत.़खरं नाही ना वाटत? पण वस्तुस्थिती आहे.मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत ते उपाध्यक्षपदासाठी प्रोगे्रसिव्ह डॅेमॉक्रॉटिक अलायन्स या पॅनलतर्फे निवडणूक लढवत आहेत.त्यांची लढत नंदकिशोर भारतीय यांच्याशी आहे.मुंबई प्रेसक्लबच्या निवडणुका उद्या 26 तारखेला होत आहेत.त्यासाठी दोन पॅनलमध्ये चुरस दिसून येते..या निवडणुकीत बहुतेक पदांसाठी सरळ लढत आहे.
अध्यक्षपदासाठी प्रकाश अकोलकर आणि सुमंत मिश्रा याच्यात सरळ लढत आहे.चेअरमनपदासाठी गुरबिरसिंग आणि मयुर परिख यांच्यात लढत आहे.उपाध्यक्षपदासाठी नंदकिशोऱ भारतीया आणि कुमार केतकर यांच्यात सामना होणार आहे.सेक्रेटरीसाठीही सरळ लढत आहे.जॉईंट सेक्रेटरीपदासाठी रोहित चंदावरकर आणि अभिजित साठे हे मैदानात आहेत.कार्यकारी मंडळासाठी 17 उमेदवार मैदानात आहेत.निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून जतीन देसाई काम पाहात आहेत.मृत्यूजय बोस यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रॉटिक फॅन्ट नावाने गुरबिरसिंग आणि अकोलकर यांचा पॅनल निवडणूक लढवत असून कुमार केतकर या पॅनलतर्फेच उपाध्यक्ष पदासाठी लढत आहेत.या निवडणुकीकडे मुंबईतील माध्यमांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे लक्ष आहे.