मुरूड येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डा. प्रविण बागूल यांची नियोजीत वेळेपूर्वी तडकाफडकी बदली झाल्याने मुरूडकर ग्रामस्थांनी आज तहसिल कचेरीवर मोर्चा काढला होता. यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग अधिक दिसून आला. आपल्या दीडवर्षाच्या कालावधीत महिला रूग्णांसाठी घेतलेल्या परिश्रमांची ही पावती असल्याचे सा-यांचे मत होते.
अपूरी जागा, अपूरा कर्मचारी वर्ग व अपूर्ण सुविधा असताना देखील दीड वर्षाच्या कालावधीत डा. प्रविण बागूल यांनी दिलेल्या सेवेमुळे ओपीडी, अंतररूग्ण, डीलीव्लरी व आपरेशन यात खूप वाढ झालेली दिसून येतानाच डा बागूल यांची तडकाफडकी बदली झाल्याने व दहा वर्षात महिलांसाठी असलेले रूग्णालय सुरू न करीत असल्याबद्दल मुरूडकरांचा हा तीव्र संताप आरोग्य संचालनालयाला दिसेत का…. याची दखल घेतली जाईल का याचा जाब येथील ग्रामस्थ विचारत आहेत.