31 लाखांचे रक्तचंदन जप्त

0
846

आंतरराष्ट्रीय बाजारात ्र31 लाखांचे मूल्य असलेला रक्तचदनाचा पाच टनाचा साठा वनविभागाच्या पश्चिम विभागाच्या भरारी पथकानं काल मध्यरात्री पकडल्यानं जिल्हयात खळबळ उडाली आहे.कर्जत नजिक चौक-खालापूर रस्त्याच्या लगत धाब्यावर एक टेम्पो चार-पाच तास संशयास्पदरित्या उभा असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आल्यानंतर पथकाने टेम्पोची पाहणी केली असता त्यात रक्तचंदन असल्याचे आढळून आले.त्यानंतर वनविभागाने टेम्पो ताब्यात घेतला असला तरी काळोखाचा फायदा घेऊन आरोपी फरारी झाले आहेत.प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

(Visited 78 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here