रायगड जिल्हयातील पंधरा पंचायत समित्यांमधील आरक्षणासाठी 31 जुलै रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापतींसाठी आरक्षण नक्की होत असल्याने साऱ्याच राजकीय पक्षांच्या या सोडतीकडे नजरा लागल्या आहेत.जिल्हयातील 15 पैकी बहुतेक पंचायत समित्यांच्या सभापतींच्या अडिच वर्षांची मुदत संपली असून त्यांच्या निवडणुकांच्या तारखाही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.आरक्षण सोडतीच्या वेळेस जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीस उपस्थित राहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.
रायगड जिल्हयातील सात पंचायती समित्या राष्ट्रवादीकडे,तीन शेकापकडे तर तीन शिवसेनेकडे आणि एका ठिकाणी कॉग्रेसचे सभापती आहेत एक पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात आहे.