डाॅ.दोभोळकरांचा आत्मा बोलतोय,

0
1303

पुण्याच्या बिनडोक पोलिसांचं थोतांड
अंधश्रध्दा निमुर्लन समितच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रातील अंधश्रध्देच्या विरोधात आवाज उठविला त्या डाॅख्टर नरेंद्र दाभोलकरांचा आत्मा आपल्याला बोलला आणि त्यानी ज्या दिवशी दाभोलकरांची हत्या झाली त्याच्या आदल्यादिवशीचा सारा घटनाक्रम सांगितला असा बिनडोक दावा पुण्याच्या पोलिसांनी केला असल्याची माहिती सामाजिक कायर्कतेर् आणि पत्रकार आशिष खेतान यांनी आउटलूक या मासिकात लिहिलेल्या लेखात दिली आहे.आऊटलुक या मासिकामध्ये आज छापून आलेल्या लेखामध्ये आशिष खेतान यांनी गुलाबराव पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रतापाचा लेखाजोखा मांडला आहे.दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नाही, असं दिसल्यानंतर पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी माजी पोलिस अधिकारी रणजित अभ्यंकर यांच्या साथीनं प्लॅन्चेटची विधी केल्याचा दावा खेतान यांनी केला. ही माहिती खुद्द पोळ यांनीच आपल्याला दिल्याचंही खेतान यांनी सांगितलं.
पोलिस आयुक्तालयात प्लॅन्चेट?
या तंत्र-मंत्राच्या विधीसाठी पोळ यांना साथ मिळाली ती निवृत्त पोलिस हवालदार मनिष ठाकूरची. विशेष म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पोलिस आयुक्तालयात झाल्याचा दावाही खेतान यांनी केला आहे.
जेव्हा हा विधी सुरु झाला, त्यावेळी मनिष ठाकूर यांच्या अंगात डॉ. दाभोलकरांचा आत्मा आला आणि त्यानं आपल्यावर हल्ला झाल्याच्या आदल्या दिवशीचा घटनाक्रमही सांगितल्याचं पोळ यांनी सांगितल्याची माहिती खेतान यांनी या लेखात दिली आहे.
दरम्यान हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा गुलाबराव पोळ यांनी केला असून खेतान यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं पोळ यांनी सांगितलं आहे.पुणे:
अजित दादा उवाच
नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी तंत्रमंत्राचे उपाय झाले असतील, तर माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यावर त्वरीत कारवाई होईल,असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
ज्या अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं, त्याच अंधश्रद्धेचा वापर करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं बिनडोक काम पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते आशिष खेतान यांनी केला आहे.