3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन असतो.या दिनाचं औचित्य साधून गेली दोन वर्षे राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते.यंदाही तालुका आणि जिल्हा स्तरावर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत.पत्रकारांचं आयुष्य धावपळीचं असतं.कामाच्या व्यापात नेहमीच आपल्या तब्येतीकडं दुर्लक्ष होतं.याचा फटका बसतो.गेल्या नऊ महिन्यात राज्यातील सहा तरूण पत्रकारांचे ह्रदयविकाराने निधन झाले आहे.प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्यानेच हे अकाली मृत्यू आले आहेत.त्यामुळं आपली आणि आपल्या कुटुंबाची किमान वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी केली जावी ..प्रत्येक शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरं घेण्याची विनंती करण्यात येत आहे.गेल्या वर्षी 200 वर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत आरोगय तपासणी शिबिरं घेतली होती.यावर्षी हा आकडा किमान 300 वर जावा अशी अपेक्षा आहे.आपण समाजासाठी आयुष्यभर राबत असतो आता वर्षातून किमान एक दिवस आपण आपल्यासाठी द्यावा अशी माझी आपणाकडे विनंती आहे.आरोग्य तपासणी शिबिर हे आपल्या चळवळीतील महत्वाचा उपक्रम असल्याने तो यशस्वी कऱणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.तेव्हा येत्या 3 डिसेंबर सर्व तालुक्यात,जिल्हयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून सर्व पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या आरोग्याची तपासणी क़रून घ्यावी ही विनंती

(  मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here