बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जिल्हयातील पत्रकारांचे पहिले अधिवेशन 20 सप्टेंबर 2018 रोजी अंबाजोगाई येथे होत असून यावेळी मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे.प्रत्येक जिल्हयांनी जिल्हा अधिवेशन भरवावे अशा सूचना मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 20 सप्टेंबर 2018 रोजी अंबाजोगाईच्या पावन भूमी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बीड जिल्हा स्तरीय अधिवेशन व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन
मा. ना. धनंजयजी मुंडे ( विरोधी पक्ष नेते विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होत असून
या प्रसंगी मा. समीरन वाळवेकर (जेष्ठ माध्यम तज्ञ व सुप्रसिद्ध वृत्त निवेदक), मा. यशवंत भंडारे (माहिती संचालक, महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (मराठवाडा विभाग, औरंगाबाद), मा. एस एम देशमुख (विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद) यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.
अंबाजोगाई शहरातील नागझरी (शेपवाडी) परिसरात असलेल्या एम आय टी संचलित सरस्वती पब्लिक स्कुलच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न होणाऱ्या या अधिवेशनाचे उदघाटन
20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मा. ना. धनंजयजी मुंडे ( विरोधी पक्ष नेते विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होत असून या प्रसंगी मा समीरन वाळवेकर (जेष्ठ माध्यम तज्ञ व सुप्रसिद्ध वृत्त निवेदक), मा. यशवंत भंडारे (माहिती संचालक, महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (मराठवाडा विभाग, औरंगाबाद), मा. एस एम देशमुख (विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष
म्हणून बीड जिल्हा काँगेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांची निवड करण्यात आली असून आ. संगीताताई ठोंबरे, मा.आ. श्री. जयदत्त अण्णा क्षीरसागर (बीड विधानसभा मतदार संघ), मा. श्री. प्रकाश दादा सोळंके (मा आमदार, मांजलगाव), मा. श्री.सिद्धार्थजी शर्मा (अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद) मा. श्री. किरणजी नाईक (विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद)
मा. श्री. शरद पाबळे (कोषाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद) मा. श्री. अनिल महाजन (सरचिटणीस, मराठी पत्रकार परिषद), मा. श्री. प्रमोद माने, (विभागीय सचिव औरंगाबाद), मा. श्री. राजेसाहेब देशमुख (शिक्षण सभापती जी प बीड), मा. श्री. राजेशजी कराड (समनव्यक, एम आय टी संचलित, सरस्वती पब्लिक स्कुल,अंबाजोगाई)
मा. श्री नंदकिशोर मुंदडा (जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस), मा. श्री.रमेशराव आडसकर(चेअरमन, आंबसाखर)
मा श्री सारंग पुजारी (उपनगराध्यक्ष, अंबाजोगाई न.प), मा श्री प्रथ्वीराज साठे (मा.आमदार, केज)
मा श्री बजरंग बप्पा सोनवणे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस बीड)
मा श्री बन्सीधर सिरसाट चेअरमन बीड जिल्हा सह. मजूर संस्थाचा सहकारी संघ, बीड मा. सौ आशाताई संजय दौंड (जी प सदस्य), मा श्री डॉ द्वारकादासजी लोहिया (जेष्ठ समाजसेवक)
मा श्री बी आय खडकभावी(प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई), मा. डॉ. सुधीर देशमुख
अधिष्ठाता, स्वा रा ती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई
प्रा. एस. पी. कुलकर्णी (छत्रसेना प्रमुख, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई), मा. श्री. एन पी भंडे
(कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई)
मा. श्री. सचिन मुळुक (बीड जिल्हा शिवसेना प्रमुख) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये संपन्न होणाऱ्या या अधिवेशन प्रसंगी
बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आपल्या लेखणीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवनाऱ्या बीड जिल्ह्याच्या माती मधील नामवंत पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या मध्ये स्व सुंदरराव सोळंके स्मर्ती पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार पी टी आय प्रतिनिधी, मुंबई श्री विलास तोकले यांना, स्व. बाबुरावजी आडसकर समरनार्थ पत्रकारिता पुरस्कार संपादक, दै सुराज्य श्री सर्वोत्तम गावरस्कर यांना
स्व. प्रभाकरराव कुलकर्णी समरणार्थ श्रमिक पत्रकारिता पुरस्कार दै. चंपावती पत्र, बीड चे उपसंपादक मा. श्री दगडू पुरी यांना
मराठी पत्रकार परिषद बीड च्या वतीने देण्यात येणारा स्व भास्कर चोपडे समरणार्थ युवा पत्रकारिता पुरस्कार दै. दिव्यमराठी बीड चे उपसंपादक मा श्री रवी उबाळे यांना
सन्मानित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी बीड जिल्ह्यातील सर्व दैनिकांच्या संपादकाची उपस्थिती लाभणार असून अधिवेशनाच्या प्रारंभी सकाळी 10 वाजता सुभाष शेप प्रस्तुत ‘ स्वररत्न ‘ या भावगीत व देशभक्ती पर संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून
या सोहळ्यास पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सुभाष चौरे (जिल्हाध्यक्ष), दत्तात्रय अंबेकर (कार्याध्यक्ष), विलास डोळसे (बीड जिल्हासरचिटणीस),
विशाल साळुंके (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), अनिल वाघमारे (सदस्य अधिस्वीकृती समिती)
अशोक खाडे (जिल्हा निमञंक, हल्ला विरोधी कृती समिती)
संतोष स्वामी (सोशल मीडिया प्रमुख), परमेश्वर गीते (जिल्हा सहसचिव ), प्रदीप तरकसे (जिल्हा सह संघटक), गजानन मुडेगावकर (निमंत्रक, हल्ला विरोधी कृती समिती), प्रकाश लखेरा (अध्यक्ष, अंबाजोगाई पत्रकार संघ), विरेंद्र गुप्ता (सचिव, अंबाजोगाई पत्रकार संघ), दादासाहेब कसबे (अध्यक्ष, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ)
गोविंद खरटमोल (सचिव अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ)
सालम पठाण (अध्यक्ष, आदर्श ग्रामीण पत्रकार संघ) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here