*मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार कल्यान निधी समितीची स्थापना*
*
बीड प्रतिनिधि
मराठी पत्रकार परिषद सलग्न पत्रकार कल्यान निधी समितीची स्थापना करण्यात आली असुन पत्रकार हितार्थ उपक्रम या योजनेमार्फत राबवणार असल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी सांगितले आहे.बीड येथिल विश्राम गृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जनजिवनात सतत व्यस्त व धकाधकीत असणार्या पत्रकारांना भविष्यात आपल्या आजार व अतिमहत्वाच्या वेळी आर्थिक बाबतीत कमतरता भासु नये याकरिता पत्रकारांचा कोष भरलेला हवा या उद्देशाने पत्रकार कल्यान निधीची स्थापना करण्यात आली असुन बीड जिल्ह्यात सर्व पत्रकार बांधवांनी या योजनेचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे यांनी सांगितले.दै.पुण्यनगरीचे बीड जिल्हा प्रतिनिधी व मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा सरचिटणीस भास्कर चोपडे यांचे नुकतेच निधन झाले होते. भास्करराव चोपडे यांना बीड जिल्ह्यातुन मराठी पञकार परीषदेच्या अवाहणास मोठा प्रतीसाद मिळाला व आर्थिक मदत केली होती.भविष्यात पत्रकारांना अशी वेळ येउ नये या करिता सर्व पत्रकारांसाठी पत्रकार कल्यान निधीची स्थापना करण्यात आली आहे.पत्रकारांनी जमा केलेल्या निधीतुन गरजु पत्रकाराला मदत या योजनेतुन करण्यात येणार आहे. बीड येथिल शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पत्रकार कल्यान निधी समितीची स्थापना करुन हि योजना बीड जिल्ह्यात राबवण्याबाबत चर्चासत्र यावेळी ठेवण्यात आले.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त
सर्वांनी शुभेच्छा या वेळी दिल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश बियानी सय्यद शाकेर ,प्रदेश प्रतीनीधी विशाल सांळूके,अधिस्विकृती सदस्य अनिल वाघमारे,सोशल मिडिया सेल प्रतिनिधी संतोष स्वामी रामचंद्र जोशी,संपादक नागनाथ सोनटक्के,अनिल आष्टपूञे,हरीश यादव,प्रकाश काळे,जुनैद बागवान,हनूमान बडे,बालाप्रसाद जाजू ,सुर्यकांत बडे,लक्ष्मन नरनाळे,जगन्नाथ परजाने,प्रंचड सोंळके,प्रदीप मुळे उपस्थित होते.