मीही लाभार्थी ! (नाही )

0
1310

आपलं सरकार,फसवी जाहिरातबाजी दमदार..

माहिती आणि जनसपंर्क विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयामुळं आज पुन्हा एकदा सरकारची चांगलीच फजिती झाल्याचं दिसून आलंय.पुरंदरमधील शांताराम कटके या शेतकर्‍यानं आपण लाभार्थी नसल्याचं जाहीर करून सरकारची कालच कोंडी केली होती.आज रइसा शेख यांनी देखील आपण सरकारची मिधे नाही आहोत हे स्पष्ट करून सरकार कश्या फसव्या जाहिराती करीत आहे ते दाखवून दिलं आहे.रइसा शेख यांना आघाडी सरकारच्या काळात 2013 मध्ये इ-सेवा क्रेद्र मिळालं होतं.दोन महिन्यापुर्वी ते देखील काढून घेतलेलं असताना या सरकारनं इ-सेवा क्रेद आम्ही दिल्याचं रइसा शेखचा फोटो टाकून सांगितलं.आपलं सरकार,कामगिरी दमदार असं सागणारं हे सरकार फसव्या जाहिराती करीत असल्याबद्दल मोठी नाराजी आहे.माहिती आणि जनसंपर्क विभागानं आता जाहिरात प्रसिध्द होताच त्याचे खुलासे करणारी मी लाभार्थी नाही अशी खुलाश्याची जाहिरात तयार ठेवावी कारण दररोज हा विभाग तोंडघशी पडत आहे.माहिती आणि जनसंपर्क विभाग आपली कातडी वाचविण्यासाठी आता कसा खुलासा करतो ते बघायचे
चुकीच्या जाहिराती करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयानं संभाजी पवार यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठविताना त्यावर राजेश संभाजी पवार यांच्या पत्रावर शुभेच्छा असा मजकूर लिहिल्याने याची देखील चर्चा सुरू आहे.चुकीचा मजकूर लिहून त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी घेणार्‍या अधिकार्‍यांवर आता काय कारवाई होते ते बघायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here