अनिल महाजन यांचा बीडमध्ये सत्कार
धारूर* (वार्ताहर) येणाऱ्या 16 नोव्हेंबर रोजी छोट्या वर्तमान पत्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात व जेष्ठ पञकाराना पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी साठी राज्यात सर्वत्र धरणे आंदोलन करण्यात येणार आसून बीड जिल्ह्यातील सर्व साप्ताहिक व दैनिकाच्या संपादकांनी पञकारानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पञकार परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी धारूर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा व पत्रकारांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात बोलताना केले.
धारूर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, सोशल मीडिया प्रमुख संतोष स्वामी, जिल्हा सहसचिव परमेश्वर गित्ते, उपाध्यक्ष शेख शाकेर, पत्रकार प्रमोद कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, कल्याण कुलकर्णी, अंबाजोगाई तालूका समनव्यक गजानन मुडेगावकर यांच्या सह असंख्य पत्रकार उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ संपादक सर्वोत्तम अण्णा गावरसकर यांची उपस्थिती होती. धारुर पत्रकार संघाच्या वतीने उपस्थितांचा तर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अनिल महाजन यांचा भगवदगिता चे पुस्तक,शाल,पुष्पहार व फेटा बांधुन संतोष स्वामी यांनी सत्कार केला. या वेळी बोलताना अनिलजी महाजन म्हणाले की, धारूर पत्रकार संघ हा जिल्ह्यात आदर्श पत्रकार संघ आहे याचा आम्हाला अभिमान आसून राज्यातील पत्रकारांचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या माध्यमातून धारूरच्या सारख्या ग्रामीण भागाला मिळाली आहे. ज्या वेळी पत्रकारावर अन्याय होतो त्या वेळी राज्यातील पत्रकाराचा आवाज उठतो तो एस. एम. देशमुख यांचा. त्यांनी संधी दिल्या मुळे बीड जिल्ह्यात 450 पत्रकारांचे संघटन उभा राहू शकले. व आज जिल्ह्याचे पत्रकार माझ्या पाठीमागे राहिले त्या मुळे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, हा ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान आहे. माझ्या कडून या पुढे काम करताना ग्रामीण पत्रकार केंद्र बिंदु समजून काम करण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिस्वीकृती धारक पत्रकारांना होतो, त्या मुळे या पुढील काळात ग्रामीण पत्रकारांना या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळवून देता येईल या साठी परिषद प्रयत्न करणार आहे. परिषदेच्या लढ्या मुळे राज्यात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला मात्र त्याच्या अमलबजावणी साठी राष्ट्रपती यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. राज्यातील जेष्ठ पत्रकाराना इतर राज्या प्रमाणे पेन्शन योजना कशी लागू करता या साठी प्रयत्न केला जाईल. राज्यात पत्रकारांचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी या पुढील काळात परिषदेचे प्रयत्न राहनार असून लवकरच जिल्ह्यातील पत्रकाराना ओळख पत्र व विमा पॉलिसी वाटप करण्यात येईल.
येणाऱ्या 16 नोव्हेंबर रोजी छोट्या वर्तमान पत्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पञकाराच्या विवीध प्रश्ना वर राज्यात सर्वत्र धरणे आंदोलन करण्यात येणार आसल्याने बीड जिल्ह्यातील सर्व साप्ताहिक व दैनिकाच्या संपादकांनी व पञकारानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल महाजन यांनी या वेळी बोलताना केले. या प्रसंगी सुभाषजी चौरे, दत्तात्रय अंबेकर, संतोष स्वामी, प्रमोद कुलकर्णी, चंद्रकांत देशपांडे, प्रमोद पुसरेकर, नंदकुमार पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राम शेळके, प्रकाश काळे यांनी प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष शाकेर यांनी केले या प्रसंगी संपादक अभिजीत गुप्ता,बंडू खांडेकर,रामदास साबळे,सय्यद दाऊत, बालाप्रसाद जाजू, सुंर्यकांत बडे सह बीड, धारुर,अंबाजोगाई,माजलगांव येथील पत्रकार उपस्थित होते.