15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना दोन हजार एसएमएस पाठविणार

छोट्या वृत्तपत्रांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.नवे सरकारी धोरण त्याचाच एक भाग आहे.त्यामुळं हे जाहिरात धोरण नसून ते सरकारने बजावलेले ‘डेथ वॉरंट’च आहे अशी राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्र मालकांची- संपादकांची भावना झालेली आहे.सरकारनं हे जाहिरात धोरण त्वरित रद्द करावं अशी छोटया वृत्तपत्रांची मागणी आहे.

सरकारनं नव्या जाहिरात धोरणाबाबत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.इमेलव्दारे हरकतींचा पाऊस पाडला जात आहे.राज्यभरातून एक हजार हरकती माहिती आणि जनसंपर्ककडे पाठविल्या जात आहेत.मात्र हा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या कानी घालणे आवश्यक आहे.म्हणूनच नव्या सरकारी जाहिरात धोरणास विरोध करणाऱे किमान दोन  हजार एसएमएस किंवा ट्टिटरवरून मेसेज मुख्यमत्र्याना 15 ऑगस्ट रोजी पाठविले जाणार आहेत.त्याचा मजकूर खालील प्रमाणे असेल.

फडणवीस साहेब,नव्या सरकारी जाहिरात धोरणामुळे राज्यातील बहुतेक छोटी वृत्तपत्रे बंद होणार आहेत.त्यामुळं आमचा या जाहिरात धोरणास विरोध आहे.हे ‘डेथ वॉरंट’ त्वरित  रद्द करावे अशी विनंती आहे.

या मजकुराचा एसएमएस 9373107881 या मुख्यमंँत्र्यांच्या फोन नंबरवर पाठवावा  किंवा  @dev_fadnavis    या ट्टिटरवर  मेसेज करावा अशी विनंती आहे.

मराठी पत्रकार परिषद,मुंबई 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here