प्रवीण गायकवाडांचा ‘अलिबाग मुक्काम’

0
1400

शेतकरी कामगार पक्षाची ताकद अलिबागपुरतीच उरली आहे,नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हा पक्ष जिल्हयातही चौथ्या स्थानावर फेकला गेला.अलिबाग सोडली तर एकही नगरपालिका शेकापच्या वाटयाला आली नाही.त्यामुळं सैरभैर झालेल्या पक्षनेतृत्वाला आता कुणाच्या तरी मदतीची गरज वाटू लागली आहे.प्रवीण गायकवाड शेकापच्या गळाला लागले आहेत.प्रवीण गायकवाड यांची ताकद मर्यादित आहे.मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड या मार्गाने ते आता धर्मनिरपेक्ष वगैरे वगैरे शेकापमध्ये दाखल होत आहेत.परिस्थिती अशी आहे की,शेकाप आणि गायकवाड अशा दोघांनाही आधाराची गरज आहे.एकत्र येत ते परस्परांना हा आधार देऊ इच्छितात.मात्र शेकाप प्रवेशाचा ना गायकवाड यांना फायदा होणार ना शेकापला.शेकापचा जीव स्वाभाविकपणे रायगडात गुंतलेला आहे.रायगडात गायकवाड यांना कोणी विचारत नाही.त्यामुळं गायकवाड यांचा फार उपयोग होणार नाही.फार तर टीव्हीवर प्रवक्ते म्हणून ते शेकापची बाजू मांडू शकतील.एक गोष्ट नक्की की,गायकवाड शेकापमध्ये फार दिवस रमणार नाहीत.शेकापमध्ये अनेकजण वाजत-गाजत आले पण नंतर ते कधी शेकापमधून बाहेर पडले ते कुणाला कळलेही नाही.प्रवीण गायकवाड यांची अवस्था तशीच होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here