राजकारणी आणि वृत्तपत्रांचे मालक याची कशी मिलीभगत आहे आणि त्यात सामांन्य पत्रकारांचे कसे बळी पडतात याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.घटना हरियाणातलीय.झी न्यूजचे पत्रकार महेंद्र सिंह यांनी भाजपचे मुख्यमंत्री खट्टर यांना काही किरकोळ प्रश्न विचारले होते.जनतेचा वकिल या नात्यानं राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं कामच आहे.मात्र अडचणीचे प्रश्न नेत्यांना आवडत नाहीत हे अनेकदा स्पष्ट झालं आहे.रायगडमधील सावित्री दुर्घटनेच्या वेळेस एका पत्रकारानं पालक मंत्री मेहतांना असाच एक अडचणीचा प्रश्न विचारला तर त्या पत्रकाराला धक्काबुक्की केली गेली.मात्र सारा मिडिया पाठिशी राहिल्यानं मेहतांना नंतर माफी मागावी लागली.मात्र हरियाणात बिचारे महेंद्रसिंह एकटे पडले.त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.कारण अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित पत्रकाराची तक्रार थेट झी न्यूजचे मालक आणि संपादक यांच्याकडं केली .त्यानंतर महेंद्र सिंह यांना राजीनामा देण्यास सांगितलं गेलं.महेंद्र सिंह आपली डयुटी करीत होते.तरीही त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे.राजकारण्यांच्या दबावाला बळी पडत आपल्याकडंही अनेक मालकांनी आपल्या पत्रकारांना घरी पाठविलं आहे.ज्यांनी हल्ले केले त्यांचीच माफी मागण्यासही मालकांनीच भाग पाडल्याची उदाहऱणं आहेत.त्यामुळं पत्रकारांना कोणी तारणहार राहिलेला नाही.पॅकेज वगैरे मालकांनी तयार केलेले फंडे असले तरी त्यात पत्रकार बदनाम होतात.नोकरी गेल्यानंतर पत्रकारावर येणारी वेळ कठीण असते.अशा स्थितीत पत्रकार संघटनांनी एकत्र येत संबंधित पत्रकाराला मदत करण्याची गरज असते मात्र असं होताना दिसत नाही.महेंद्र सिंग आज एकटे पडले आहेत.
खुट्टर यांना अडचणीचे कोणते प्रश्न महेंद्र सिंह यांनी विचारले होते ते बघा.
क्या थे सवाल और क्या मिले जवाब…
रिपोर्टर महेन्द्र सिंह- सर नोटबंदी से लोग दुखी हैं। देश लाइनों में खड़ा है। सब परेशान हैं।
मुख्यमंत्री खट्टर- नार्थ ईस्ट से बच्चे हरियाणा घूमने आए हैं। उनसे मिलकर बड़ी खुशी हुई। आयोजकों, खासकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद को बधाई।
रिपोर्टर- सर नोटबंदी पर तो बताईये..
मुख्यमंत्री- ऐतिहासिक निर्णय, देश मोदी जी के साथ।
रिपोर्टर- लाइन में लगे लोगों को आपने कहा था कि ये लोग नोटों की अदला बदली के धंधे में लगे हैं।
मुख्यमंत्री -30 दिसंबर के बाद सब सही हो जाएगा।
रिपोर्ट- सर SYL पर आपने राष्ट्रपति से मिलके ड्यूटी पूरी कर दी। प्रधानमंत्री से क्यों नहीं मिलते? करना तो उन्हें है..
मुख्यमंत्री -बस बस बहुत हो गया
कमांडो -हटो हटो..
इसके बाद रिपोर्टर महेन्द्र सिंह की जी न्यूज से छुट्टी कर दी गई।