गेल्या सुमारे ६५ वर्षांची परंपरा असणार्या अलिबाग समुद्र किनारच्या धुळवडीच्या शर्यतींचा आस्वाद घेण्याकरीता तब्बल एक लाख शर्यत शौकीनांनी हजेरी लावली होती. अलिबाग मच्छिमार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या या शर्यतीत यंदा तब्बल १00 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. दहा गटांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात आली.
बैलगाडी व्यतिरिक्त, टमटम घोडागाडी, एक्का घोडागाडी, दुक्का घोडागाडी, घोडेस्वार आणि साकलस्वार यांच्याही शर्यंती यावेळी झाल्या. किना-यांवर एकच गर्दी झाली होती