पत्रकार माणिक केंद्रे यांच्या कुटुंबियांना
मराठी पत्रकार परिषदेची
11,000 रूपयांची मदत जाहीर
उशीर तर झालाच आहे पण मदतीची गरज आजही आहे…माणिक केंद्रे गेले पण त्यांच्या पत्नी अकोला येथे उपचार घेत आहेत..त्याही अपघातात गंभीर जखमी झाल्या असून -मृत्यूशी संघर्ष करीत आहेत.या माऊलीला आपला पती या जगात नाही याचीही कल्पना नाही..तीन मुलं निराधार झालेले आहेत..वृध्द आई आहे.. त्यामुळं मदतीची गरज आहे आणि त्यासाठी मदतीचे हात समोर आलेच पाहिजेत..सरकारी निमयात काय बसते काय नाही हे मला माहिती नाही पण आपण मात्र हात न आखडता समोर येऊन माणिक केंद्रे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला पाहिजे..मराठी पत्रकार परिषद यासाठी पुढाकार घेत असून 11,000 रूपयांची मदत जाहीर करीत आहे..माझी वैयक्तीक 1000 रूपयांची मदतही मी देत आहे..मला कल्पना आहे की ही रक्कम फारच तुटपुंजी आहे.. मात्र सर्वांनी हातभार लावला तर मोठी रक्कम जमा होऊ शकेल.. ही रक्कम आजच माणिक केद़े यांच्या मुलीच्या खालील खात्यावर जमा केली जाईल..
मुलीचा खाते नंबर
कु.यशश्री माणिकराव केंद्रे
बँक:- भारतीय स्टेट बँक
शाखा:- पाथरी
खाते क्र. 62281605640
आयएफसी:- SBIN0020373
स्व माणीक केंद्रे यांच्या मुलीचा हा नंबर,आहे कृपया वरील अंकाऊट वर थेट मदत करावी हि विंनती 🙏
पत्रकारितेवर निष्ठा असणार्या आणि पत्रकाराला निर्भयपणे,स्वाभिमानानं पत्रकारिता करता यावी असं ज्यांना वाटतं त्यांनी कोणताही किंतू-परंतू मनात न आणता वेळेचं भान ठेऊन सढळ हातानं केंद्रे यांच्या कुटुबिंयांना मदत करावी अशी मी कळकळीची विनंती करीत आहे..
एस.एम.देशमुख