अलिबाग- निवडणूक कर्तव्य बजावताना ह्रदयविकाराने मृत्यूमुखी पडलेले पोलादपूर तहसिल कार्यालयातील लिपिक योगेश नथुराम भिसे यांच्या वारसांना दहा लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केली आहे.
बुधवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना महाड तालुक्यातील एका मतदान केंद्रावर कार्यरत असलेले योगेश भिसे यांना ह्रदयाविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.निवडणुुकीचे कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू आल्यास वारसांना दहा लाखांची नुकसान भरपाई देण्याची तरतूद निवडणूक आयोगाने केलेली आहे.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे त्याबबातीच शिफारस केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही रक्कम मंजूर केली असून ती जिल्हा प्रशासनातर्फे लवकरच भिसे यांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे,