कसे याल औढा नागनाथला ?
चलो औढा..
1 सप्टेंबर रोजी छोटया वृत्तपत्रांचा एल्गार मेळावा..
मराठवाड्यात तीन ज्योर्तिंलिंग आहेत.बीड जिल्हयातील परळी येथे वैजनाथ,औरंगाबाद जिल्हयातील वेरूळ येथे घृष्णेश्वर आणि हिंगोली जिल्हयातील औढा येथे नागनाथ.आमर्दकपूर असं पुराणातील नाव असलेलं औढा हे तीर्थक्षेत्र भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.औढा येथे नागनाथाचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे.290 बाय 190 फुटाच्या आवारात मंदिराचा विस्तार आहे.त्या भोवती एक परकोट आहे.परकोटाला चार प्रवेशव्दार आहेत.उत्तरेकडील प्रवेशव्दारावर नगारखाना आहे.तेच मुख्य प्रवेशव्दार.आवारातच एक पायविहिर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो.मुख्य मंदिराची लांबी 126 फूट,रूंदी 118 आणि उंची 96 फूट आहे.औढा येथे संत नामदेवांचे गुरू विसोबा खेचर यांची समाधी देखील आहे.त्यामुळं धार्मिकदृष्टया मराठवाडयातील प्रमुख ठिकाण असलेल्या औढा नागनाथचा विकास मात्र फारसा झालेला नाही.शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे आणि पावसाचे सरासरी प्रमाणही कमी असल्यानं हा परिसर कायम दुष्काळाच्या छायेत असतो.
औढा नागनाथला जाण्यासाठी केवल रस्ता मार्गच उपलब्ध आहे.पुण्याहून औढा नागनाथला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.पुणे -नगर- गढी – माजलगाव – पाथरी- परभणी- औढा नागनाथ हा एक मार्ग आहे तर दुसरा पुणे-नगर-जालना- सेलू-आणि औढा नागनाथ असा आहे.सांगली,कोल्हापूरहून येणार्या पत्रकारांना बारामती,बार्शी,केज,धारूर,माजलगाव,परभणी मार्गे औढा नागनाथला जाता येईल.नागपूर येथून येणार्यांसाठी अमरावती- करंजा- मंगरूळपीर-वाशिम-कान्हरगाव-हिंगोली मार्गे औढा नागनाथला येता येईल.औढा नागनाथला रेल्वे स्थानक नाही.मुंबईहून रेल्वेनं येणार्या पत्रकारांनी परभणी स्थानकावर उतरायचे आहे.तेथून प्रत्येकी दहा मिनिटाला औढा नागनाथला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.
1 सप्टेंबरच्या एल्गार मेळाव्याची तयारी परिषदेचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत.मात्र नियोजनाच्यादृष्टीनं सोयीचं व्हावं यासाठी सर्वांनी खालील फोन नंबरवर फोन करून किंवा एसएमएसव्दारे आपण उपस्थित राहणार असल्याची सूचना द्यावी.नंदकिशोर तोष्णीवाल 9422878374 आणि विजय दगडू 9822181277 असे या पदाधिकार्यांचे मोबाईल नंबर्स आहेत.
कार्यक्रमात थोडा बदल झालेला आहे.छोटया आणि मध्यम वृत्तपत्र मालक- संपादकांचा मेळावा सकाळी 10 वाजता सुरू होईल.दुपारी 2 वाजता मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होईल.एल्गार मेळावा आणि बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.