पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने जाहीर केलेले १७ फेब्रुवारी चे डी.आय.ओ कार्यालयाला घेराव आंदोलन पूर्ण शक्ती निशी यशस्वी करण्याचा निर्धार मराठी पत्रकार परिषदेच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आला.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक होते.राज्यभरातील ३५ पैकी २९ जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि जिल्हा अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते.१७ फेब्रुवारीच्या आंदोलनाची तयारी आणि संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी हि बैठक बोलावण्यात आली होती.बैठकीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आंदोलनाची माहिती दिली .ते म्हणाले १७ फेब्रुवारी रोजी ११ वाजता राज्यातील पत्रकार आप आपल्या जिल्ह्यातील ,जिल्हा माहिती कार्यालयात जातील आणि तेथे तीव्र स्वरुपाची निदर्शने आणि सरकार च्या विरोधात तीव्र स्वरूपाचे निदर्शने आणि घोषणाबाजी करतील आणित्यानंतर मागण्यांचा निवेदन जिल्हा माहिती अधिकार्यांना देण्यात येतील.पत्रकार सौरक्षण कायदा व्हावा आणि पत्रकारांना पेन्शन मिळावे तसेच अन्य ८ मागण्यांसाठी करण्यात येणारे हे आंदोलन यशस्वी करण्याचे आव्हान हि बैठकीत करण्यात आले.बैठकीस कार्याध्यक्ष चन्द्रशेकर बेरे,सरचिटणीस संतोष पवार,सिद्धार्थ शर्मा ,सुभाष भारद्वाज,शरद पाबळेराजेंद्र कापसे ,बापू गोरे,सुनील वाळूंज आदि उपस्थित होते.
Home मराठी पत्रकार परिषद १७ फेब्रुवारीचे आंदोलन सर्व शक्ती निशीयशस्वी करणार मराठी पत्रकार परिषदेचा निर्धार..