हेच खरे बाळशास्त्री
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन 18 मे 1846 रोजी झालं.. 175 वर्षे उलटली आहेत या घटनेला. .. त्यामुळे बाळशास्त्रींचं मुळ छायाचित्र उपलब्ध असण्याची शक्यता नाही.. गुगलवर त्यांची वेगवेगळी चार छायाचित्रे दिसतात… प्रत्येक छायाचित्रकाराने ती आपल्या कल्पनेतून साकारलेली आहेत.. बाळशास्त्री कसे होते हे तर आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही. पण गुगलवरून छायाचित्र उचलताना आणि ते वापरताना आपण याचा जराही विचार करीत नाही की जे छायाचित्र आपण उचलले आहे ते बाळशास्त्रीच्या व्यक्तीमत्वाच्या जवळपास तरी जाणारे आहे की नाही..? . गुगलवर फिरणारया चित्राच्या छायाचित्रकारांनी ती साकारताना बाळशास्त्रींच्या व्यक्तीमत्वाच्या अभ्यास केलेला आहे असे दिसत नाही.. कोणी तरी सांगितले आणि चित्र रेखाटले असे या चित्रांचे स्वरूप दिसते .. त्यामुळे बहुतेक चित्रातील बाळशास्त्री साठी ओलांडलेले म्हणजे वयोवृद्ध, थकलेले,कृश, निस्तेज वाटतात.. बाळशास्त्री तसे नव्हते.. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते.. म्हणजे अत्यंत तरूण वयात ते गेले.. ते नियमित व्यायाम करीत असल्याने त्यांची शरीरयष्टी पिळदार होती.. प्रकांड पंडित असलेल्या बाळशास्त्रींची विद्वतता त्यांच्या चेहरयावर विलसत होती.. तारुण्यसुलभ आत्मविश्वास त्यांच्या चेहरयावर आणि व्यक्तीमत्वात दिसत होता..ते रूबाबदार होते.. प़सिध्द चित्रकार मुकुंद बहुलेकर यांनी वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून बाळशास्त्रीचे छायाचित्र रेखाटले.. 2000 साली पुणे येथील बालगंधर्व मध्ये झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक़मात या छायाचित्राचे प्रकाशन शिवसेना प़मुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी हेच खरे बाळशास्त्री” अशा शब्दांत या छायाचित्रावर मान्यतेची मोहर उठविली होती.. शिवाय चित्रकार बहुलेकर यांना मंचावर बोलावून त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारली.. बाळासाहेब हे विख्यात चित्रकार, व्यंगचित्रकार आणि पत्रकार होते.. त्यांनीच चित्रास मान्यता दिल्याने मराठी पत्रकार परिषदेने हेच छायाचित्र तेव्हापासून वापरायला सुरूवात केली.. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ देखील हेच छायाचित्र वापरत आहेत.. महाराष्ट्र सरकार 6 जानेवारीला जाहिरातीमधून बाळशास्त्रींचे बहुलेकर यांनी रेखाटलेले चित्र वापरत आहे.. म्हणजे सरकारने देखील या छायाचित्रास मान्यता दिलेली आहे.. त्यामुळे आता कोणी छायाचित्रावरून वाद उकरून काढू नये..
मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यामुळे बाळशास्त्रींच्या नावाचा थोर व्यक्तींच्या नावाच्या यादीत समावेश करण्यात आला, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या अथक पाठपुराव्यामुळे सरकारने साडेपाच कोटी रूपये खर्च करून ओरस येथे बाळशास्त्रींचे भव्य स्मारक ऊभारले आहे. ..त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे.. मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देण्याची मागणी देखील परिषदेने लावून धरल्याने काही आत्मे अस्वस्थ झाले असल्यास नवल नाही.. त्यातून चुकीचे छायाचित्र माथी मारण्याचा प्रयत्न होतो आहे.. तो सर्वथा अनुचित आणि गैर आहे.. महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना आमची विनंती आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केलेलेआणि मुकुंद बहुलेकर यांनी रेखाटलेले सोबतचे छायाचित्र येत्या ६ जानेवारी रोजी दर्पण दिनी वापरावे .. कारण हेच छायाचित्र बाळशास्त्रींच्या व्यक्तीमत्वाजवळ जाणारे छायाचित्र आहे…
एस.एम.देशमुख