कासारवडवली येथील हत्त्याकांडांचे वृत संकलन करणारे पत्रकार रतन राधेश्याम भौमिक याचं ह्रदयविकारानं निधन झाल्याची बातमी जेवढी धक्कादायक तेवढीच पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर बनला आहे याची जाणीव करून देणारी आहे.भौमिक याचं वय 31 वर्षाचे होते.31 वय हे काही ह्रदयविकार व्हावा असं नाही.मात्र अलिकडे सातत्यानं पत्रकार ह्रदयविकाराचे शिकार होताना दिसत आहेत. गेल्या दोन वर्षात असे पाच-सहा तरूण पत्रकार आपल्याला सोडून गेले आहेत.धावपळ,अवेळी जेवण,ताण-तणाव,सवयी या सर्वांचा परिणाम शरीरावर होतो.शिवाय जाग्रणं होतात आणि व्यायाम अजिबात होत नसल्यानं अशा व्याधी जडताना दिसतात.शिवाय नियमित तपासणी कोणताच पत्रकार करीत नाही.वरकरणी ठणठणीत वाटणारी प्रकृत्ती आतून पोखरत केव्हा जाते ते कळतही नाही.एक दिवस सारंच संपलेलं असतं.म्हणूनच मराठी पत्रकार परिषद गेली दोन वर्षे 3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करीत आहे.त्याचा फायदा अनेकांना झाला असून वेळीच काळजी घेतल्याने पुढील अनर्थ टळल्याचे काही पत्रकार मित्रांनी सांगितले आहे.खरं तर वर्षातून किमान दोन वेळा अशी शिबिरं व्हायला पाहिजेत.त्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करावे लागतील.हे काय पत्रकार संघटनेचे काम आहे काय? म्हणून काही जण जरूर नाकं मुरडतात पण पत्रकारांचं सर्वार्थानं हितरक्षण हेच पत्रकार संघटनेचं काम असल्याने भविष्यात एक चळवळ म्हणूनच आरोग्या शिबिराचं आयोजन मराठी पत्रकार परिषद करणार आहे.भौमिक याचं आकस्मिक निधन सर्वानाच विचार करायला लावणारं आहे.भौमिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली.-