हवामान खात्याच्या विरोधात पोलिसात तक्रार

0
10481

हवामान खात्याच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल.

पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे.हा फसवणुकीचा प्रकार आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज आज माजलगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी गंगाभीषण थावरे यांनी  दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.कायदेशीर बाबी तपासून अर्जावर पुढील निर्णय घेणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करीत यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस होमार असल्याचे जाहीर केले होते.त्यावर विसंबून देशातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या होत्या.त्यासाठी महागडे बियाणे खरेदी केले होते.प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही.त्यानंतरही येत्या 48 तासात पाऊस येणार 72 तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकर्‍यांना फसवत राहिले,यामागे बियाणे कंपन्या,खत आणि औषधी कंपन्यांचे आणि हवामान खात्याचे काही आर्थिक हितसंबंध असावेत अशी शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले असून ही तक्रार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली गेली आहे.यावर दोन दिवसात कारवाई झाली नाही आणि गुन्हा दाखल केला गेला नाही तर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.
हवामान खात्याच्या विरोधात तक्रार दाखल होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here