येत्या मान्सूनवर “एल निनो”ची दाट छाया राहणार असल्यानं यंदा सरासरीच्या 93 टक्के एवढाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं सोमवारी व्यक्त केलेला असतानाच तो अंदाज खरा ठरू लागल्याचे किमान रायगडमध्ये तरी दिसून येत आहे. गतवर्षी रायगडमध्ये 9जून रोजी 2 हजार 712 मिलीमिटर पाऊस झाला होता.या दिवसाचे सरासरी पर्जन्यमान 125.45 एवढे होते.गतवर्षी 9 जूनपर्यत जिल्हयात एकूण 48571 मिलीमिटर एवढी दमदार पाऊस झाला होता.मात्र यंदा आजपर्यत जिल्हयात एक मिलीमिटरही पाऊस झालेला नसल्यानं भविष्यात काय वाढून ठेवलंय य़ाचा अंदाज जिल्हयातील जनतेला येऊ लागला आहे.
पाऊस नसल्याने उष्म्याचे प्रमाण पं्रचंड वाढले आहे.जिल्हयातील पाणीटंचाईतही मोठी वाढ झाली आहे.पाणी पातळी घटल्याने टॅन्करची संख्या वाढवावी लागत आहे.गतवर्षीच्या अनुभव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीची सारी कामं केली असून तो आता पावसाची प्रतिक्षा करीत आहे.मात्र पाऊस येत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.