उत्तराखंडमधील लाडली हत्याकांडाच्या तपासात पूर्ण अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आपला सारं वैफल्य काल पत्रकारांवर काढलं.मुख्यमंत्री पिडित कुटुबियांच्या भेटीला येऊन गेल्यानंतर शिशमहल येथे लोकांनी रस्ता रोको केला.त्याचं कव्हरेज करण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर पोलिसंांनी अमानूषपणे दंडे चालविले.पत्रकारांचा पोठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली.या हल्लयात 13 माध्यमकर्मी जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृत्ती चिंतानजक आहे.त्याच्यावर एका रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.